News34 chandrapur
चंद्रपूर – आपले कमावलेले पैसे सुरक्षित रहावे यासाठी आपण ते पैसे सुरक्षित रहावे यासाठी आपलं खाते असलेल्या बँकेत जमा करीत असतो मात्र आता बँकेत पैसे ठेवल्यास वार्षिक व मासिक आपल्याला शुल्क द्यावे लागत आहे.
आपले पैसे बँकेत असले तरीही मासिक बँक शुल्क म्हणून पैसे कापल्या जात आहे, मात्र चंद्रपुरातील दुर्गापूर येथे बँक ऑफ इंडिया च्या शाखेत असलेल्या एका खातेधारकासोबत काही भलतंच घडलं ज्यामुळे त्या ग्राहकांचा संताप अनावर झाला.
चंद्रपुरातील दुर्गापूर भागात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मागील अनेक वर्षांपासून वेकोली कॉलोनी मध्ये राहणाऱ्या दुधनाथ चव्हाण यांचं बचत खाते आहे.
2 वर्षापूर्वी त्यांच्या ATM कार्ड ची तारीख संपली होती, त्यानंतर चव्हाण यांना नवे ATM कार्ड बँकेतर्फे मिळाले, मात्र 2 वर्षात बँकेने बंद असलेल्या ATM कार्ड चे सुद्धा शुल्क आकारले.
2 महिन्यात चव्हाण यांच्या खात्यातून 295 रुपये ATM चार्ज म्हणून कापण्यात आले, याबाबत चव्हाण यांनी बँकेत जात अधिकाऱ्यांना विचारणा केली, मात्र तुमचे 2 ATM सध्या सुरु आहे म्हणून शुल्क आकारण्यात आले अशी माहिती चव्हाण यांना कळली.
ATm कार्ड ची मुदत संपल्यावरही बँकेने ते कार्ड बंद केले नाही, विशेष म्हणजे त्या कार्डाची मुदत 2 वर्षाआधी संपलेली होती, त्यांनतर चव्हाण यांना नवे atm कार्ड देण्यात आले, सध्या ते नव्या कार्डावर सर्व आर्थिक व्यवहार करीत आहे.
ते कार्ड बंद करण्याची जबाबदारी तुमची आहे असे बँकेने चव्हाण यांना सांगितले, बँकेच्या या उत्तराने चव्हाण काही वेळ अवाक राहिले, कार्ड बंद करण्याची जबाबदारी बँकेची असते मात्र त्यांनी ते बंद करण्यास नकार दिला.
बँकेच्या या उत्तराने चव्हाण यांना मानसिक धक्का बसला असून जे कार्ड सुरू नाही त्याचे पैसे मी का देऊ असे बँक अधिकाऱ्यांना सांगत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रार करू असे सुनावले.
अखेर 2 दिवसांनी बँकेला आपली चूक कळली आणि त्यांनी बँकेतील ग्राहक दुधनाथ चव्हाण यांना शाखेत बोलावीत त्यांचे पैसे परत केले, याबाबत चव्हाण यांनी सांगितले की ATM कार्ड ची मुदत संपल्यावर बँकेतर्फे अधिकृत मोबाईल क्रमांकावर कॉल करून नवे कार्ड घेऊन जाण्यासंदर्भात संदेश येतो, मात्र आता तसे काही होताना दिसत नाही, जेणेकरून ग्राहकांना आता जागरूक रहावे लागेल.