चंद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट बुकीचे नेटवर्क पुन्हा सक्रिय

क्रिकेट सट्टा पुन्हा जोमात

News34 chandrapur

चंद्रपूर – IPL च्या सोळाव्या हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात बुकीचे नेटवर्क मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते, मात्र News34 ने वारंवार पाठपुरावा करीत ते नेटवर्क उध्वस्त करायला पोलीस विभागाला भाग पाडले.

मात्र 3 महिन्यांनंतर पुन्हा बुकीचे नेटवर्क सक्रिय झाले आहे, सध्या आंतरराष्ट्रीय टेस्ट व तामिळनाडू प्रीमियर लीग वर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावल्या जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सक्रिय असलेल्या बुकीच्या नेटवर्क वर कारवाई न व्हावी यासाठी लाखो रुपये वाटप करण्यात आले आहे.

चंद्रपूर शहरात सध्या 16 क्रिकेट बुकीचे नेटवर्क सक्रिय आहे, मात्र पोलीस प्रशासनाच्या कारवाईपासून ते आताही दूर आहे.

बुकींना सध्या संरक्षण देण्यासाठी एक अधिकारी दरमहा लाखो रुपये वसूल करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे, नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया टेस्ट मॅच मध्ये सुद्धा चंद्रपुरातील बुकींतर्फे करोडो रुपयांची उलाढाल झाली, आता पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाल्याने बुकींनी आपले पंटर नेमून सट्टाव्यापार सुरू केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर सध्या बुकीकडून वसुलीची जबाबदारी आली आहे, मात्र बुकीकडून पैसे घेतल्यावर तो स्वतःला शरीफ समजण्याचे काम करीत आहे.

चंद्रपूर पोलीस अधीक्षक ह्या बुकीं नेटवर्क वर कारवाई करणार काय? चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेल्या बुकिंना पोलीस क्लिन बोल्ड करणार काय? हा मोठा प्रश्न आहे.