News34 chandrapur
चंद्रपूर – जटपुरा गेट येथे चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात गद्दार दिवस आंदोलन करण्यात आले.
शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत झाले. खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपुरात ‘गद्दार दिवस’ आंदोलन राबविण्यात आले. खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली असल्याचा संदेश या निषेध आंदोलनातून देण्यात आला.
राष्ट्रवादी कांग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकार विरोधी घोषणा दिल्या…
आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी..,
चले जाव-चले जाव.. गद्दार गुवाहाटी चले जाव..!
महाराष्ट्र त्रस्त… खोके घेऊन गद्दार मस्त..,
पन्नास खोके.. माजलेत बोके माजलेत बोके…
गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..!
महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार..,
खोके सरकारचा चालणार नाही थाट गद्दारांना दाखवू कात्रज चा घाट
खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय…
अशा गद्दारांविरोधात विविध घोषणा दिल्या या आंदोलनामध्ये चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव काकड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर चंद्रपूर विधानसभा चे अध्यक्ष सुनील काळे ,महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद लबाने ओबीसी सेलचे अध्यक्ष विपिन झाडे आकाश निरटवार ,कुमार पाल बब्बू भाई इसा, निसार शेख सेवा दलाचे अध्यक्ष किशनराव झाडे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे सुरज चौहान,मनोज सोनी शहर महासचिव संभा केवले मुन्ना तेंडुलकर संजय जोगी पंकज धेंगरे, देवा धामंगे,अनुकूल खन्नाडे,सौरभ घोरपडे, मनोहर भाई काच्छेला, संजय बिस्वास,हिमागी बिस्वास, उषा ताई रामटेके,विपील लभाने तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.