News34 chandrapur
चंद्रपूर – मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर व बल्लारपूर शहरातून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याच कारण म्हणजे जड वाहतुकीला जाण्यासाठी शहरी मार्ग अवलंबिला जात आहे, मात्र इतक्या वर्षात एक बायपास सुद्धा राज्यकर्ते निर्माण करू शकले नाही, ही आपल्या जिल्ह्यासाठी दुर्दैवी बाब आहे अशी खंत कांग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय यांनी व्यक्त केली.
माजी भाजप आमदार नाना श्यामकुळे यांनी पडोली ते बंगाली कॅम्प या मार्गावर उड्डाणपूल निर्माण व्हावा यासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले होते, शहरातून होणारी जड वाहतूक त्या उड्डाणपूल वरून गेल्यास वाहतूक विस्कळीत ची समस्या कायमची मिटली असती, मात्र तो उड्डाणपूल काही तयार झाला नाही.
चंद्रपूर नंतर बल्लारपूर येथे सुद्धा वाहतुकीची अशीच समस्या आहे, पेपरमिल ते बामणी पर्यंत वाहतुकीची मोठी समस्या आहे, त्या मार्गावर सुद्धा उड्डाणपूल व्हावा अशी मागणी विनोद दत्तात्रय यांनी वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या चंद्रपूर व बल्लारपूर शहरातून राज्य व केंद्रीय महामार्ग जातो त्यामुळे जड वाहतूकिला शहरातून प्रवास करावा लागतो, यामुळे अपघातांचे प्रमाण व ट्रॅफिक जाम चे प्रकार वाढत आहे, यावर कुठेतरी आळा बसविणे आवश्यक आहे, त्यासाठी बायपास किंवा उड्डाणपूल हा एकमात्र उपाय असल्याचे दत्तात्रय म्हणाले.
नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नागपूर येथील रस्ते सुधार कार्यक्रम करिता 1 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, सुधीर मुनगंटीवार हे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील बायपास किंवा उड्डाणपुलाबाबत केंद्रीय मंत्र्यांना मागणी करावी असे निवेदन दत्तात्रय यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना दिले आहे.