डॉ. अशोक जीवतोडे यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी कांग्रेसचे किती नुकसान?

ओबीसी समाज संघटनेच्या या मागण्या पूर्ण होतील काय?

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्यातील विदर्भवादी ओबीसी नेते प्राध्यापक अशोक जीवतोडे 25 जून ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी कांग्रेसला राम राम करीत भाजपात पक्षप्रवेश करणार आहे अशी घोषणा स्वतः डॉ. अशोक जीवतोडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

जीवतोडे हे राष्ट्रवादी पक्षाला सोडत भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादी कांग्रेसला हा धक्का आहे का? याबाबत राजेंद्र वैद्य यांनी आपली प्रतिक्रिया News34 ला दिली आहे.

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य म्हणाले की जीवतोडे हे आमच्या पक्षाला आधार होते त्यांच्या जाण्याने पक्षाला काही प्रमाणात हाणी पोहचली, जीवतोडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला होता, त्यांना भाजप पक्षाने काही आश्वासन दिलं असेल म्हणून ते त्या पक्षात जात आहे.

जीवतोडे हे अनेक वर्षांपासून ओबीसी चळवळीत सक्रियपणे काम करीत आहे, मात्र आजही ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित आहे, त्यांनी सत्ताधारी पक्षाला ओबीसी आरक्षणाची मागणी करायला हवी.

डॉ.अशोक जीवतोडे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समनव्यक म्हणून ओबीसी चळवळीत काम करीत आहे. हे ओबीसी महासंघ अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी झटत आहे.

त्यामध्ये जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी विविध मागण्यांचा समावेश आहे, भाजप सरकारने अनेक ओबीसी च्या बाजूने निर्णय घेतले, अनेक GR काढले असे वक्तव्य डॉ. जीवतोडे यांनी केले होते.

आता 25 जून ला डॉ. जीवतोडे भाजप पक्षात गेल्यावर या मागण्यांचा ते पाठपुरावा करणार काय? यावर अनेक ओबीसी समर्थकांचे लक्ष लागले आहे, विशेष म्हणजे विधानसभेत प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण 72 वसतिगृह निर्माण करण्याची घोषणा केली होती मात्र त्यावर अजून काही काम झाले नाही, केंद्र सरकारने आजपर्यंत क्रिमिलिअर ची मर्याद वाढविली नाही, बिहार राज्याने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनी सुद्धा असा निर्णय घ्यावा अशी मागणी जीवतोडे करणार काय यावर ओबीसी बांधवांच्या नजरा लागल्या आहे.