News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सतत वाढत असलेली गुन्हेगारी आता प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे, 22 जून ला शहराच्याया मध्यभागी स्थित दुकानात रात्री 9.30 ते 10 वाजताच्या सुमारास एका अज्ञात युवकाने पैसे हिसकावीत पळ काढला.

कस्तुरबा रोड वरील कोतपल्लीवार पेट्रोल पंप समोरील स्पेअर पार्ट चे दुकान रात्री बंद करीत असताना एका अज्ञात युवकाने दुकान मालकांचे लक्ष नसल्याचे पाहून गल्ल्यातील पैसे काढत तिथून पळ काढला.
काही समजण्याआधी तो युवक तिथून जोरात पळाला, दुकान मालकाने तात्काळ शहर पोलिसांना याबाबत सूचना दिली असता शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी पोहचले, त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून लवकर त्याला अटक होणार अशी शक्यता आहे.