News34 chandrapur
चंद्रपूर – संस्कार भारती चंद्रपुर शाखेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन शनिवार दि. ८ जुलै २०२३ रोजी सायं ७ वाजता करण्यात आले आहे. या गुरुपौर्णिमा उत्सवात श्री नटेश्वर पूजन आणि गुरुपूजन करण्यात येणार आहे.
यंदा गुरुपूजनासाठी चंद्रपुरातील ज्येष्ठ व्हायोलिन वादक श्री जयंत देऊरकर यांची निवड करण्यात आली आहे. श्री जयंत देऊरकर हे जुन्या पिढीतिल ज्येष्ठ व्हायोलिन वादक म्हणून विख्यात आहे.

अनेक संगीत मैफिलीना त्यांनी आपल्या कलाकौशल्याने स्वरसाज चढवला आहे. केवळ स्वरमंचच नाही तर त्यांनी व्हायोलिन वादनाच्या माध्यमातून रंगमंच देखील उजळला आहे. अनेक नाटके व एकांकिकांना त्यांनी संगीत दिले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
अशा या ज्येष्ठ स्वरसाधकाच्या गुरुपूजन प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉ .प्रा. पराग धनकर , सौ. जयाताई भारत यांची उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने संस्कार भारती च्या संगीत व नृत्य विधा सदस्यांतर्फे गुरुवंदना सादर करण्यात येणार आहे.
संस्कार भारतीच्या या गुरुपौर्णिमा उत्सवाला चंद्रपूरकर कलाप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कार भारती जिल्हा मंत्री मंगेश देऊरकर , चंद्रपूर शाखेच्या अध्यक्षा सौ संध्या विरमलवार , उपाध्यक्ष डॉ राम भारत , सचिव लिलेश बरदाळकर, प्रांत कुटुंब आयाम प्रमुख ऍड .भावना हस्तक यांच्यासह संस्कार भारती चंद्रपूर शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.