News34 chandrapur
चंद्रपूर – राज्यात महिला अत्याचारात एकीकडे वाढ होते आहे तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेवर सरकार गंभीर नसल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे महिला अत्याचारातील सर्वात जास्त प्रमाण हे कार्यालयीन महिलांवर होणारे आहे.
अशीच एक माहिती News34 च्या हाती आली असून चंद्रपूर जिल्ह्यात एका भागात कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील वर्तन केल्याची बाब उजेडात आली आहे.
इच्छा नसतांना सुद्धा त्या अधिकाऱ्याने त्या महिला कर्मचाऱ्याचा हात पकडत तिच्यासोबत अश्लील गैरवर्तन केले, मात्र आपण कुणाला तक्रार केली तर आपली बदनामी होणार या भीतीपोटी ती महिला कर्मचारी शांत आहे. पण त्या अधिकाऱ्याने केलेली वृत्ती तिला खटकली.
ही बाब मागील महिन्याभरा पूर्वीची आहे अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाला सदर महिला कर्मचारी कंटाळली त्यामुळे ही बाब तिने आपल्या पतीला सुद्धा सांगितली, मात्र तक्रार केल्यास आपली बदनामी होणार या भीतीपोटी त्या महिलेने तक्रार देणे टाळले.
25 जून रोजी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर दौरा असल्याने स्वतःवर झालेल्या अन्यायाची तक्रार ती महिला त्यांना करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रशासनाने त्या वासनांध अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा अश्या घटना पुन्हा वाढल्याशिवाय राहणार नाही.
पोलिसांनी याबाबतीत आपले सूत्र हलवावे जेणेकरून या गंभीर बाबीवर तात्काळ कारवाई करणे शक्य होणार.