News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या मंत्र्यांची रेलचेल सूरु असताना बंदोबस्तासाठी पोलीस विभाग आपले कर्तव्य पार पाडत आहे.
आज 25 जून ला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असताना अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात झाला आहे. त्यापूर्वी पोलीस अधीक्षकांनी सर्व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तात तैनात करण्यापूर्वी सुखद धक्का दिला.

बंदोबस्तात कुणाला काय जबाबदारी मिळणार याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात बोलाविले, मात्र तिथे पोहचताच पोलीस कर्मचाऱ्यांना सुखद धक्का पोहचला, कारण अनेकदा बंदोबस्ताची जबाबदारी घेण्यासाठी येणारे कर्मचारी चटई वर बसायचे मात्र यंदा सर्वाना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था करण्यात आली होती.
पूर्वी अधिकारी हे खुर्ची वरती बसायचे आणि अंमलदार हे खाली चटई वरती बसायचे.. मात्र यावेळी संपूर्ण हॉल मधे खुर्च्या टाकलेल्या दिसल्या.. आधी अमलदाराना समजले नाही की या खुर्च्या आपल्या साठी आहे .. नंतर त्यांना गृह पोलीस उपअधीक्षक फडके मॅडम यांनी सांगितले की या खुर्च्या तुमच्यासाठीच आहे.. आता तुम्ही सुद्धा अधिकारी सारखे खुर्ची वरती बसणार.. आणि सगळ्या पोलिस बंधवामध्ये आनंद पसरला.याचे सर्व श्रेय हे पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू तसेच गृह उपअधीक्षक राधिका फडके यांना गेले.
बंदोबस्त संपला की कर्मचारी थकव्या चेहऱ्याने घरी परततात, मात्र यंदा पोलीस अधिक्षकांचा दिलदार पणा बघून पोलीस यंत्रणा मनात नव्या जोशाचे अनुसरण करीत बंदोबस्तात रुजू झाले.