चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांचा भाजप पक्षात प्रवेश

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समनव्यक व विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.

(alt="obc leader entry bjp party in chandrapur")
भाजप पक्षात प्रवेश घेताना अशोक जीवतोडे

 

काय म्हणाले डॉ. अशोक जीवतोडे?

 

डॉ. अशोक जीवतोडे यांनी वर्ष भरापूर्वी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये प्रवेश केला होता, मात्र महाविकास आघाडी सरकार मध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे काम होत नसल्याने डॉ.जीवतोडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सोडला.
महाविकास आघाडी सरकार शिंदे च्या बंडावर पडले, त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले, या सरकार ने ओबीसी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, विशेष म्हणजे फडणवीस यांचे विदर्भाच्या विकासावर मोठं लक्ष आहे, विदर्भावर होत असलेला विकास व ओबीसी बांधवांच्या अनेक हिताचे निर्णय फडणवीस घेत आल्याने त्यांच्या कार्याला बघून मी भाजप पक्षात प्रवेश केला असे डॉ. जीवतोडे यांनी म्हटले.

कार्यक्रमात अशोक जीवतोडे यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकत पक्षप्रवेश करण्यात आला, यावेळी नुकताच फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्कार प्राप्त पुष्पा पोडे यांचा देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दमदार भाषण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला जीवतोडे यांना हुजूर आते आते देर कर दि असे म्हणत तुमच्या ओबीसी चळवळीला आमचं सरकार व पक्ष संपूर्ण ताकदीने पुढे नेणार व ओबीसी समुदायाला न्याय देण्याचे काम करणार.
भाजपने केंद्रात सर्वात जास्त ओबीसी मंत्री देण्याचे काम केले आहे, सामान्य कुटुंबातील चहावाला देशाचा पंतप्रधान बनला ही बाब आपल्यासाठी गौरवाची आहे.

 

आज समृद्धी महामार्ग आम्ही गडचिरोली पर्यंत नेणार आहो, वेळ प्रसंगी तो मार्ग आम्ही चंद्रपूर पर्यंत आणू, तुम्ही आधी राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये होता, राष्ट्रवादी कांग्रेसला ओबीसी समाजाचे फक्त चेहरे हवे पण ते ओबीसी नेत्यांना पद देत नाही, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आम्ही सुरू केली आहे, आम्ही आधीपासून ओबीसी समाजाला न्याय देत आहोत, कारण भाजप पक्षाचा मूळ DNA ओबीसी चा आहे.

आपल्या ओबीसी चळवळीला आमचं पूर्ण पाठबळ राहणार असून भविष्यात ओबीसी समाजाला ज्या समस्या उदभवणार त्या समस्या सोडविण्याचे काम आमचं सरकार जरूर करेल.

 

पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार बंटी भांगडीया, संदीप धुर्वे, शोभाताई फडणवीस, आशिष देशमुख यांची उपस्थिती होती.