News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही – चंद्रपूर जिल्ह्यातील वाळू घाटाच्या रेती उपस्याचे काम संपले असले तरी आजही मोठ्या प्रमाणात वाळू माफिया अवैध वाळू उत्खनन करीत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मूल, सिंदेवाही, सावली व पोम्भूर्ना हे अवैध वाळू माफियांचे रेती उत्खननाचे हब बनले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव मार्गा कडे जाणाऱ्या रोडवर शासनाचा विना परवाना रेती ची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाहन क्रमांक -MH- 34 ,BV-7646 व विना नंबर असलेली ट्राली असा अंदाजे एकुण किमंत -6 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला असुन ट्रॅक्टर – ट्राली जप्त केली आहे.
अवैध रेती ची ट्रॅक्टर द्वारे वाहतुक करणारा चालक घटनास्थळावरून पळुन गेल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे. तसेच सिंदेवाही पोलीस विना परवाना शासनाची रेती ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकाचा शोध घेत आहेत. अश्याप्रकारची ही कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार तुषार चव्हाण यांनी केली आहे.