News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – सोमवार दिनांक : 26/06/2023 ला छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून कोसंबी येथे सलग चौथ्या वर्षी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी गावातील एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सलग चार वर्षे रक्तदान करणारे कोसंबी येथील हे 25 रक्तदाते आहेत. यापुर्वी 2020 ला 37, 2021 ला 38, 2022 ला 36 जनांनी रक्तदान केलेले आहे.
रविंद्र कामडी सरपंच, आणि सुरज आकनपल्लीवार ग्रामसेवक कोसंबी यांच्या संकल्पनेतून हे शिबिर दरवर्षी आयोजित करण्यात येते.
याप्रसंगी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रविंद्र कामडी सरपंच कोसंबी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सारीका गेडाम उपसरपंच, पंकज पवार समाजसेवा अधिक्षक, लक्ष्मीकांत गाखरे रक्तकेंद्र तंत्रज्ञ, अमोल जिद्देवार रक्तकेंद्र तंत्रज्ञ, आशिष कांबळे रक्तकेंद्र तंत्रज्ञ, रुपेश घुमे, अभिलाश कुकडे हे प्रमुख अतिथी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज आकनपल्लीवार यांनी केले. पंकज पवार यांनी रक्तदानाचे फायदे व गरजुंना अडचणीच्या वेळी मदत होऊन जीव कसा वाचतो यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून मान. रविंद्र कामडी सरपंच कोसंबी यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे, आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते असे विचार प्रकट केले. प्रत्येक वर्षी कोसंबी येथील युवक स्वेच्छेने रक्तदान करतात त्यामुळे गावातील युवकांचे याप्रसंगी भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश मोहुर्ले, मनीष चौधरी, प्रज्वल चौधरी, सुरज चहारे, सचिन झोडे, निखिल मोहुर्ले, ईश्वर चौधरी, संदीप मोहुर्ले व युवक मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गटलेवार मुख्याध्यापक यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश देमोहुर्ले यांनी केले.
रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोसंबी येथे प्रत्येक वर्षी होत असलेल्या रक्तदान शिबीरामुळे मुल तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.