News34 chandrapur
चंद्रपूर – सूर्य कोपल्यावर नागरिक पावसाची आतुरतेने वाट बघत असतात मात्र पाऊस आली की अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे पावसाळ्यात किड्यांचा होणारा त्रास, हा त्रास सायंकाळी मोठ्या प्रमाणात उदभवतो.

हे किडे घरी येऊ नये यासाठी अनेक नागरिक विविध उपाय करतात मात्र त्यानंतर सुद्धा हे किडे घरात शिरतात.
ह्या किड्यांच्या प्रादुर्भावापासून स्वतःला वाचवायचे असेल तर काही उपाय आपण करून बघावे.
पाऊस आला सायंकाळ झाली की प्रकाशाभोवती भिरभिरणारे किडे, माश्यांचा उच्छाद प्रचंड प्रमाणात वाढतो, आपण खालील काही टिप्स चा आवर्जून वापर केल्यास सदर समस्येपासून आपण मुक्त व्हाल.
हा उपाय करा..
पाऊस पडला की सायंकाळी घरातील दिवे, लाईट लावण्यापूर्वी खिडक्या व दारे बंद करा, कारण हे किडे लाईट लावल्यावर लगेच घरात शिरतात, आपण आधीच दारं व खिडक्या बंद करणार तर हे किडे घरात प्रवेश करू शकणार नाही.
दरवाजे खिडक्या बंद केल्यावर आपण काही वेळ मेणबत्ती लावा, कारण मेणबत्ती लावल्याने किडे आत प्रवेश करीत नाही.
घरात कोपऱ्यात झेंडूच्या फुलांचा किंवा तुळशीच्या पानांचा गुच्छ ठेऊ शकता. यामुळे हे किडे घरात येत नाहीत.
आपण घरी एअर फ्रेशनर तयार करू शकता. यासाठी, एका वाटीत बेकिंग सोडा घ्या त्यात नीलगिरीचे काही थेंब, यूकेलिप्टस, सिट्रोनेला, एसेंशिअल ऑइल, व लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. हा स्प्रे वापरा. ज्यामुळे किडे व प्रकाशाजवळ भिरभिरणार नाही.
खिडकी-दारे, ट्यूबलाइट, बल्ब यांची साफसफाई करत रहा. यासाठी दोन कप पाण्यात एक कप व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणात कापड बुडवून – पिळून खिडक्या आणि दारांसह बल्ब आणि ट्यूबलाइट स्वच्छ करा.