चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात घरफोडी करणारे 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

News34 chandrapur

चंद्रपूर – 2 जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या 3 गुन्हेगाराला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे, आरोपिकडून तब्बल 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Ram nagar police station chandrapur
घरफोडी गुन्ह्यातील आरोपी

शहरातील जगन्नाथ बाबा नगरातील श्रीकृपा कॉलोनीत राहणाऱ्या 34 वर्षीय मनीष रिधुरकर यांनी 25 जून रोजी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार नोंदविली, 14 जून ला रिधुरकर हे कुटुंबासाहित ठाणे जिल्ह्यातील नातेवाईकांकडे गेले होते, त्यांनतर कुणीतरी अज्ञात इसमाने घरी प्रवेश करीत सोन्याचे दागिने व एक कॅमेरा असा एकूण 65 हजार रुपयांचा माल चोरून नेला.
पोलिसांनी कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

चंद्रपुरात 1 फुल 3 माली

 

रामनगर गुन्हे शोध पथकाच्या चमूने गुन्हा तपासात घेत आरोपींचा शोध घेणे सुरू केले, पोलिसांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला व आरोपी मेजर गेट येथील अमोल इलमकर याला अटक केली.

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”1″ order=”DESC” orderby=”post_title” view=”circles” /]

 

अमोल ला अटक केल्यावर त्याची चौकशी केली असता त्याने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे घरफोडी केली असल्याचे कबूल केले, सदर चोरी 20 जून रोजी केल्याचे अमोल ने कबूल केले, त्या चोरी मध्ये विठ्ठल मंदिर वार्ड येथे राहणारा 23 वर्षीय साहिल राजू आंबेकर, बल्लारपूर येथील 26 वर्षीय शाहरुख शेरखान पठाण यांचा समावेश होता.

पोलिसांनी तिन्ही आरोपीना अटक करीत 2 जिल्ह्यात झालेल्या घरफोडीत चोरी गेलेला एकूण 2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील घरफोडी मध्ये 1 दुचाकी वाहन व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता.

 

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउपनी मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी प्रशांत शेंदरे, विनोद यादव, मिलिंद दोडके, सतीश अवथरे, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी, विकास जाधव व भावना रामटेके यांनी केली.