News34 chandrapur
चंद्रपूर – मागील काही वर्षात मनपाच्या शाळांमध्ये आमुलाग्र बदल झाला असुन आगामी शैक्षणिक वर्ष हे मनपा शाळांसाठी सर्वाधिक गुणवत्तेचे असावे अशी अपेक्षा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी मनपा राणी हिराई सभागृहात आयोजीत शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आढावा व नियोजन सभेत संबोधित करतांना व्यक्त केली.

पालिकेच्या शाळांमध्ये झालेले बदल हे मूलभूत व गुणात्मक आहेत,आज महानगरपालिकेच्या यशस्वी उपक्रमांपैकी एक म्हणजे उंचावत असलेला मनपा शाळांचा दर्जा. इतर विभागांना जसा शिक्षणासाठी विशेष निधी मिळतो तसा मनपात नाही मात्र त्यामुळे शाळांच्या प्रगतीत खंड पडू दिलेला नाही इतर निधीतून त्याची भरपाई करून शाळांची व्यवस्था सुदृढ करण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न असतो.
वयाच्या 74 व्या वर्षी त्यांना मिळाली पदवी
सावित्रीबाई फुले शाळा ही महाराष्ट्रातील एकमेव मनपा मराठी माध्यमाची शाळा आहे जिला मागील वर्षी १० वी पर्यंत मान्यता मिळाली. आज शाळांचा निकाल ९५ टक्के लागतो आहे.शाळांचे प्रवेश हाउसफुल आहेत यात सर्व शिक्षकांचे मोठे योगदान आहे.
[web_stories title=”true” excerpt=”false” author=”true” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”grid” /]
मुलानं घडविण्यात शिक्षकांचे विचार महत्वाचे असतात. सर्व शिक्षकांनी सकारात्मकतेने काम करावे, आपल्या मुलांना जसे योग्य शिक्षण,वळण मिळावे यासाठी आपण प्रयत्न करतो तसाच विचार आपल्या शाळेतील मुलांबाबतही शिक्षकांनी करावा व येते शैक्षणिक वर्ष सर्वाधिक गुणवत्तेचे असावे अशी अपेक्षा आयुक्त यांनी व्यक्त केली.
यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश,बूट व इतर साहित्य दिले जाणार आहे. दर २ महिन्यांनी गुणवत्ता चाचणी घेतली जाणार असुन विद्यार्थ्यांचा वैचारिक स्टार वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी नागेश नित तर आभारप्रदर्शन सुनील आत्राम यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,शहर अभियंता महेश बारई व महानगरपालिकेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकगण उपस्थीत होते.