1 जुलै पासून ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील जंगल सफारी बंद

बफर क्षेत्रातील सफारी सुरू राहणार

News34 chandrapur

चंद्रपूर – पावसाळा लागला की अनेकांचे महत्वपूर्ण कामे खोळंबतात, मात्र पावसाळ्याची आतुरतेने वाट बघणारा बळीराजा सुखावतो, या पावसाळ्यात जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

Tadoba national park chandrapur
1 जुलै पासून कोअर क्षेत्रातील सफारी बंद

वन्यप्राण्यांचा प्रजनन कालावधी लक्षात घेता व त्यांच्या हालचाली अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्लीच्या निर्देशानुसार 1 जुलै पासून विदर्भातील अन्य व्याघ्रप्रकल्प सहित ताडोबा जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

[web_stories title=”false” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”1″ order=”DESC” orderby=”post_title” view=”circles” /]

 

1 जुलै ते 1 सप्टेंबर पर्यंत ताडोबा जंगल सफारी बंद राहणार मात्र पर्यटकांनी निराश होऊ नये, कोअर क्षेत्रातील सफारी बंद असली तरी बफर क्षेत्रातील सफारी सुरू राहणार आहे.