30 हजार रुपयांचे टोमॅटो चोरीला

चोरांचा टोमॅटोवर डल्ला

News34 chandrapur

चंद्रपूर/गोंदिया – सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे, यातच टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे बजेट संपूर्ण कोलमडले आहे.

टोमॅटो ची साथ आता हिरव्या पालेभाज्या देत असून त्यांचे दर आता जवळपास 50 रुपयांच्या वर जात असून टोमॅटो बाजारात 100 रु किलो दराने विकल्या जात आहे.

red tomato stolen
गोंदिया शहरात चोरांचा टोमॅटो वर डल्ला

 

यातचं गोंदिया येथे 20 कॅरोट चे टोमॅटो ची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे,  गोंदिया शहरातील एका दुकानात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने फिर्यादी बबन गंगभोज यांच्या दुकानातून 20 कॅरोटचे टोमॅटो सहित इलेक्ट्रॉनिक वजन काटा चोरला, 30 हजार रुपयांचे टोमॅटो व 10 हजार रुपयांची इलेक्ट्रॉनिक वजन काट्याची एकूण किंमत पोलीस तक्रारीत नोंदविल्या गेली आहे.

शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सध्या सुरू आहे.