News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात प्रथमच महिला पोलिस उपअधीक्षकांची वर्णी लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सतत वाढत असलेला भ्रष्टाचार व त्यावर आळा घालण्यास अपयशी आलेले प्रशासन बघता आता चंद्रपुरात भ्रष्टाचार करणाऱ्याला माफी मिळणार नसून थेट कारवाई होणार अशी चाहूल मंजुषा भोसले यांच्या मार्फत भ्रष्टाचार करणाऱ्यांना लागली आहे.
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नवीन पोलीस उपअधीक्षक पदी मंजुषा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून शिस्त प्रिय अधिकारी म्हणून भोसले यांची सर्वत्र ओळख आहे.
नागरिकांना कुणीही काम करण्यासाठी शासकीय कर्मचारी/अधिकारी यांनी लाचेची मागणी केली तर थेट आम्हाला तक्रार करा असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
मंजुषा भोसले यांनी या आधी गुन्हे प्रकटीकरण विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच दहशत विरोधी पथकामध्ये काम करत आपली यशस्वी कारकीर्द पार पाडलेली आहे. त्यांना चंद्रपूर जिल्ह्याची जवाबदारी मिळालेली असून जिल्ह्यातील पोखरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.