News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी वाजतगाजत अमृत पाणीपुरवठा योजनेची सुरुवात करण्यात आली, मात्र योजनेचे अनेक ठिकाणी उदघाटन झाल्यावर सुद्धा आजपर्यंत अनेक ठिकाणी अमृत कुणाला मिळालेच नाही.

भाजपची सत्ता असताना पदाधिकारी यांनी अवाजवी खर्च करीत अमृत योजनेचा उदघाटन समारंभ आयोजित केला, अमृत योजनेची पाहणी सुद्धा केली मात्र नागरिकांना पाणी मिळालेच नाही.
तब्बल 250 कोटींची ही योजना डबघाईस आली की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप ची सत्ता असताना त्यावेळी अनेकांनी अमृत योजनेच्या नावाखाली शेण खाल्ल्याचा आरोप केला आहे.
वेळ आली त्यावेळी आम्ही शेण खाणाऱ्यांचे नाव जाहीर करू, पक्षाची सत्ता असताना व आता प्रशासक असताना शेण खाण्याचा प्रकार सुरू आहे, अमृत योजनेच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला त्याची उच्चस्तरिय चौकशी व्हावी यासाठी नगरविकास खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून तक्रार करणार असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
अमृत योजनेची पाईपलाईन किती किलोमीटर टाकली ही सर्व माहिती अंधारात आहे, अमृत योजनेच्या नावाखाली अनेकांनी शेण खात टक्केवारी खाल्ली, आधी ही अमृत च्या नावाखाली जनतेला लुटले आता प्रशासकाच्या माध्यमातून लुटण्याचे काम सुरू आहे.