News34 samruddhi express way accident
बुलढाणा/चंद्रपूर – नागपूरवरून पुण्याच्या दिशेने निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्स चा 1 जुलै रात्री 1.30 वाजता सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा येथे भीषण अपघात झाला, या अपघातात तब्बल 26 जनांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले.

समृद्धी महामार्गावर झालेला हा अपघात आतापर्यंत चा सर्वात मोठा अपघात आहे, सतत या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे, मात्र इतके अपघात होऊन सुद्धा राज्य सरकारने यावर काही एक उपाययोजना केल्या नाही हे दुर्दैवचं.
काही यवतमाळ, नागपूर तर काही प्रवासी वर्धा जिल्ह्यातील होते, या अपघातात मृतदेह जळून कोळसा झाले, मात्र अजूनही काही मृतदेह आपली ओळख होणार या प्रतीक्षेत आहे.
वर्धा जिल्ह्यातील 14 प्रवासी या अपघातात ठार झाले, कुणाचे नोकरीचे स्वप्न तर कुणी शिक्षणासाठी पुणे च्या दिशेने निघाले होते. वाचा हे प्रवासी का निघाले पुण्याला.
अवंती पोहनकर – 25 वर्षीय अवंती ही वर्धा येथील बेद ले आऊट येथे राहणारी होती, तिला मॉडेलिंगचा छंद होता, यासाठी तिला परदेशात जायची संधी सुद्धा मिळाली मात्र आईची प्रकृती ठीक नसल्याने तिने परदेशात जाणे टाळले, आपल्या कर्तृत्वावर तिने पुण्यात नोकरी करण्याचे ठरविले.
सोमवारी तिची मुलाखत असल्याने शनिवारी ती विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्याकडे निघाली होती.
श्रेया वंजारी – 24 वर्षीय श्रेया ही स्वागत कॉलोनी मध्ये राहत होती, वडील शेतकरी होते, शिक्षण पूर्ण झाल्याने श्रेया उच्च शिक्षणासाठी कागदपत्रे सोबत घेत पुण्याकडे निघाली होती.
राधिका खडसे – साईनगर वर्धा येथे राहणारी राधिका व्हे वडील शेतकरी होते, श्रेया व राधिका या दोघी मैत्रिणी, राधिका ला फार्मसी से शिक्षण घेण्यासाठी वडीलाने तिला पुण्याला पाठविले होते.
तेजस पोफळे – कृष्णनगर वर्धा येथे राहणारा तेजस नोकरीच्या शोधात पुणे ला निघाला होता, तेजस च्या वडिलांचे फर्निचर चे दुकान आहे, वडिलांच्या डोक्यावर चे ओझे कमी करीत कुटुंबाला आधार व्हावा यासाठी तेजस नोकरीच्या शोधात होता.
शोभा वनकर, वृषाली व ओवी – एकाच कुटुंबातील हे 3 सदस्य शोभा वनकर ह्या वर्धा येथून विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये बसल्या तर वृषाली व ओवी या मायलेकी यवतमाळ जिल्ह्यातून प्रवासाला बसल्या.
शोभा यांचा मुलगा परिणीत पुणे ला स्थायिक झाला होता, परिणीत ची पत्नी, आई व मुलगी वर्धेत नातेवाईकांच्या लग्नासाठी आल्या होत्या.
लग्न आटोपल्यावर परिणीत ला काम असल्याने तो पुण्याला निघून गेला होता, वृषाली व ओवी ह्या यवतमाळ तर आई शोभा वर्धेत मुक्कामी होत्या.
करन बुधबावरे – करन हा पोस्टमन पदावर कार्यरत होता, अविवाहित असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती, विवाहित बहिणीला आषाढी सणासाठी आणायला तो पुण्याच्या दिशेने निघाला होता.
राजश्री गांगोळे – आर्वी येथे राहणाऱ्या राजश्री ला 3 मुले, त्यांची तीन मुले पुणे मध्ये राहत होते, 2 मुले नोकरीला तर एक मुलगा शिक्षण घेत होता, शिक्षण घेत असलेल्या मुलाची कागदपत्रे घेऊन त्या पुणे ला निघाल्या होत्या.
पुणे येथील गंगावणे कुटुंब – शिरूर तालुक्यात राहणाऱ्या 45 वर्षीय कैलास गंगावणे, 38 वर्षीय कांचन गंगावणे व 21 वर्षीय ऋतुजा गंगावणे या तिघांचा भीषण अपघातात मृत्यू झाला, कैलास यांचा मुलगा आदित्य याचे नाव मेरिट लिस्ट मध्ये आले होते, नॅशनल लॉ स्कुल नागपूर येथे आदित्य च्या प्रवेशासाठी गंगावणे आपल्या पत्नी व मुलीला सोबत घेऊन आले होते, मुलाचा प्रवेश झाला त्यानंतर तिघेजण परत परतीच्या प्रवासाला लागले मात्र या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
अपघात झाल्यावर 7 जण बसबाहेर कसेबसे आले मात्र बस ने पेट घेतला त्यांनी सांगितले की मागील सीटवर असलेली एक महिला लहान बाळाला सोबत बसच्या काचाला हात आपटत सुटकेसाठी याचना करीत होती मात्र प्रत्यक्ष दर्शी समोर ती महिला व तिचे बाळ जिवंत जळाले.