पवार की पॉवर? चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनात काय?

चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पदाधिकारी यांच्या मनात काय?

News34 chandrapur

चंद्रपूर – 2 जुलै ला अजित पवार यांनी बंड करीत राष्ट्रवादी कांग्रेसच्या असंख्य आमदारांना सोबत घेत भाजप शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील झाले, लगेच पवार व त्यांच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक कारणे सांगितली.

Chandrapur NCP news
चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पदाधिकारी

आगामी विधानसभा, लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप-सेनेसोबत मिळून लढणार असल्याची घोषणा केली, अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का पोहचला आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा पक्ष माझा आहे, मला जनतेची साथ असून मी जनतेत जाणार असल्याची घोषणा करीत सुनील तटकरे यांना पक्षातून काढून टाकले.

मात्र राज्याच्या राजकारणातील आलेल्या या भूकंपानंतर राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते काय म्हणतात? त्यांच्या मनात काय आहे? त्यांना पॉवर हवी की पवार? यावर चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत News34 समोर मांडले आहे.

राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस चंद्रपूर

अजित पवार हे भाजपसोबत हातमिळवणी केल्याने अनेकांना धक्का पोहचला आहे, पक्षासाठी ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, मात्र आम्ही आधीपासूनच शरद पवार यांच्यासोबत आता व पुढेही खंबीरपणे उभे राहू असे वैद्य यांनी सांगितले.

नितीन भटारकर, राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष

आमचा पक्ष म्हणजे आदरणीय शरद पवार, ते जे म्हणतील ते आम्ही करू, त्यांच्या आदेशाची आम्ही वाट बघत आहो, पवार यांच्या जाण्याने पक्षाला जो धक्का पोहचला ते कुणालाही न पटण्यासारखे आहे, मात्र आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहो.

राजीव कक्कड, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस चंद्रपूर

साहेबांनी कठीण काळात पक्ष उभा केला, हजारो कार्यकर्ते या वयात त्यांनी जोडले, या कठीण प्रसंगी आम्ही शरद पवार यांच्यासोबत राहून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करू.