अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, प्रफुल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार

मोठी घडामोड

News34 chandrapur

मुंबई/चंद्रपूर – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यावर महाविकास आघाडी सरकार पाडली होती, त्या बंडाला वर्ष उलटताच राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ही फुटला, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी 54 पैकी 30 आमदार सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

Praful patel ncp
प्रफुल पटेल

राजभवनावर सध्या शपथविधीची तयारी सुरू आहे, अजित पवार सहित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे 9 आमदार मंत्रिमंडळात सामील होणार आहे.

पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र ते काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते, अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे दुसरे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार आहे, भाजपच्या या खेळीने शिंदे गटाला मोठा धक्का लागला आहे.