अजित पवार सहित 9 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

जयंत पाटील यांची पत्रकार परिषद

News3r chandrapur

चंद्रपूर / मुंबई – अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील या 9 जणांनी शपथ घेतली. मात्र शपथ घेतलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे, 1 जुलै ला रात्री सुप्रिया सुळे, जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक बाबीचा खुलासा केला.

Press conferance jayant patil ncp
पत्रकार परिषदेत माहिती देताना जयंत पाटील

पक्षाचे अध्यक्ष व राज्य अध्यक्ष यांना अंधारात ठेवत 9 आमदारांनी राजभवनावर जात मंत्रिपदाची शपथ घेतली, ही बाब पक्ष धोरणाच्या कृतीला न शोभणारी आहे, 9 आमदारांनी त्यावेळी शपथ घेतली ते त्यावेळी पक्षातून अपात्र झाले.

9 आमदारांची आमदारकी रद्द करीत त्यांना अपात्र ठरविण्यात यावे यासाठी विधानसभा अध्यख यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे, सोबतच निवडणूक आयोगासोबत बोलणे झाले असून त्यांना सुद्धा पत्र देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

5 जुलै ला मुंबई महत्वाची बैठक असून त्या बैठकीत अनेक निर्णय घेणार येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.