भ्रष्टाचार विरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करणार – मंजुषा भोसले

चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पत्रकार परिषद

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात प्रथमच महिला राज आले आहे, अनेक वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार महिला अधिकाऱ्यांजवळ आला आहे.

Manjusha bhosale anti corruption chandrapur
पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले

पुणे ATS मधून विदर्भातील चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले शुक्रवारी रुजू झाल्या.

 

वर्ष 1999 मध्ये पोलीस विभागात मंजुषा भोसले पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतर विदर्भात त्यांची ही पहिली पोस्टिंग आहे.

 

विशेष म्हणजे चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे व 2 महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहे, पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 14 च्या जवळपास आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती करणार

पत्रकार परिषदेत माहिती देताना उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी माहिती दिली की या विदर्भात माझी पहिली पोस्टिंग आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सध्या मी आढावा घेत असून यामध्ये भ्रष्टाचार विरोधात तक्रार करणाऱ्यांच्या मनात अनेक शंका असतात त्या शंका आम्ही जनजागृती च्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

तक्रार असल्यास तात्काळ संपर्क करा

भ्रष्टाचारापासून पीडित नागरिकांना अडचणी येत असतील तर त्यांनी थेट मला सम्पर्क करावा, जिल्ह्यात कुठेही शासकीय अधिकारी व कर्मचारी पैश्यासाठी कुणाला छळणार तर त्याला आम्ही आळा घालण्यास समर्थ आहोत.

पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे व पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले उपस्थित होते.