News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर शहरालगत असलेल्या मामला परिसरात 2 जुलै ला 2 जोडपे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी फिरायला गेले होते, मात्र त्याठिकाणी चारचाकी वाहनाने आलेल्या 5 युवकांनी दारू पिऊन धिंगाणा करीत जोडप्यांना मारहाण करीत अल्पवयीन मुलीची छेड काढली या घटनेत अल्पवयीन मुलीने तक्रार दिल्यावर 1 पोलीस कर्मचारी सहित 5 जणांना अटक करण्यात आल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

2 जुलै ला मूल रोडवरील मामला परिसरात 2 जोडपे मोटारसायकल उभी करीत त्यावर बसून होते, त्याचवेळी मामला येथून चंद्रपूर कडे जाणाऱ्या चारचाकी वाहन थांबले व त्या वाहनामधील तिघांनी जोडप्यांमधील 2 मुलांना अश्लील शब्दात शिविगाळी करीत मारहाण करायला सुरुवात केली.
[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”true” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”1″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]
अचानक घडलेल्या या प्रकाराने मुली घाबरल्या, मारहाण करणारे युवक हे दारूच्या नशेत होते, मुलींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा एक चारचाकी वाहन क्रमांक MH34 CD3536 आले त्यामधील दोघांनी जोडप्यांना अश्लील शब्दात शिवीगाळी केली.
दोघांनी एका मुलीचा हात पकडत तिला वाहनात बसविले, अल्पवयीन मुलीला त्या युवकांनी मागे बसवीत एकाने तिची छेड काढली, त्यानंतर त्या युवकाने मुलीच्या खांद्यावर हात ठेवत पोलीस स्टेशनच्या दिशेने नेत आम्ही तुमचे भाऊ आहोत असे पोलिसांना सांगा अथवा चौघांवर गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली.
त्या युवकांना न घाबरता अल्पवयीन मुलीने त्या 5 युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली, दारूच्या नशेत धुंद असलेला आरोपी हा पोलीस मुख्यालयात नोकरी करणारा C-16 मध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन बावणे तर चौव्हान कॉलोनी येथील संतोष कुशवाहा, महेंद्रसिंग सनोतरा, शंकर पिल्ले व संतोष कानके यांची ओळख झाली.
पोलिसांनी 5 आरोपी युवकांवर कलम 363, 354, 294, 143, 323, 506 व पोक्सो 8, 12 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला.
रविवारचा दिवस असल्याने 5 युवक मामला जंगलाच्या दिशेने पार्टी करायला गेले होते त्याठिकाणी दारूचे सेवन केल्यावर ते परत येत असताना त्यांना मामला रस्त्यावर 2 जोडपे उभे दिसले, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला, आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे यांनी त्या अल्पवयीन मुलीची छेड काढली, या घटनेमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे
पोलीस कर्मचारी बावणे निलंबित
जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे याला तात्काळ निलंबित केले, ते म्हणाले की पोलीस दलाचे नाव बदनाम करणाऱ्या विरुद्ध आम्ही नरमाई न ठेवता कारवाई करू, याकरिता बावणे याला घटनेच्या दिवशी निलंबित करण्यात आले.
आरोपीना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पाचही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाढीवे करीत आहे.