मूल तालुक्यात खतांची अवैध साठवणूक

भरारी पथकाची कारवाई

News34 chandrapur गुरू गुरनुले

 

मूल – दिनांक 3 जुलै 2023 रोजी सायंकाळी मुल तालुक्यातील मौजा जुनासुर्ला जिल्हा चंद्रपूर येथे भरारी पथकाने जेके फर्टीलायझर आनंद गुजरात या कारखान्याद्वारे तयार करण्यात आलेले भूमीरस ऑरगॅनिक फर्टीलायझरच्या 346 गोण्या खत जप्त करण्यात आले.

 

अमोल प्रल्हाद मडावी वय 30 मुक्काम पोस्ट पंचाळा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर याने सदर खत जूनसुरला येथील वासुदेव समर्थ यांचे घरी साठवणूक करून शेतकऱ्यास विक्री करीत असताना पकडण्यात आले.
संशयित खताचा साठा हा अनाधिकृत जागेत ठेवणे, नोंदणी प्रमाणपत्र न घेता खताची विक्री करणे, मोठ्या प्रमाणात खताची विक्री शेतकऱ्यास करणे, खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करने त्यांना अपप्रेरणा देणे. या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर मोहीम राजेंद्र साबळे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग शंकरराव तोटावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, वीरेंद्र राजपूत जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली किशोर चौधरी कृषी अधिकारी पंचायत समिती मुल, सुनील काराडवार कृषी अधिकारी पंचायत समिती मुल, देव घुणावत गटविकास अधिकारी पंचायत समिती मुल भास्कर गायकवाड तालुका कृषी अधिकारी मूल, लकेश कटरे मोहीम अधिकारी चंद्रपूर, श्रावण बोडे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक चंद्रपूर यांनी कार्यवाही केली. सदर मोहिमेत सुमित परतेकी, पोलीस निरीक्षक मुल व चमू, विनोद निमगडे कृषी सहाय्यक, आणि पंजाबराव राठोड कृषी पर्यवेक्षक मुल यांनी मोलाची कामगिरी बजावली.