चंद्रपुरात इमारतीवरून उडी मारणाऱ्या त्या युवकाची ओळख पटली

तो युवक घुग्गुस येथील रहिवासी

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नेताजी नगर भवन च्या इमारती वरून 2 जुलै ला एका युवकाने उडी मारली, या घटनेत त्या युवकाचा मृत्यू झाला.

Shocking incident chandrapur
डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले

2 जुलै ला सायंकाळी 7 ते 7.30 वाजेदरम्यान सराफा लाईन मधील महानगरपालिकेची इमारत नेताजी नगर भवन वरून एका 30 वर्षीय युवकाने उडी मारली, अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिक घाबरले, पोलिसांना तात्काळ नागरिकांनी सूचना दिली, युवकाला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ब्रह्मपुरी शहरात रस्त्यावर नागरिकांनी जाळले टायर पण का?

रविवारचा दिवस असल्याने मार्केट परिसरात शांतता आते याचा फायदा घेत युवक त्या इमारतीच्या आत गेला असेल अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

युवकाने आत्महत्या का केली, याबाबत पोलीस तपास करीत होती मात्र त्याआधी युवकाची ओळख पटविणे महत्वाचे होते, रात्री पोलिसांनी त्या युवकाची ओळख पटविली, मृतक युवकाचे नाव 30 वर्षीय सचिन केदार रा. घुग्गुस असे आहे, सचिन वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद सुद्धा आहे.

काही दिवसांपासून सचिन चे मानसिक संतुलन बिघडले अशी माहिती मिळाली आहे, त्यामुळे सचिन ने आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.