News34 chandrapur
चंद्रपूर : महाराष्ट्रातुन काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर हे निवडून आले. परंतु त्यांनी अल्पावधीतच देशात चंद्रपूरचे नाव केले. त्यासोबतच त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत अविरत काम केले. त्यांचे कार्य नेहमी प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बाळू खोब्रागडे यांनी केले.
धानोरकर जनसंपर्क चंद्रपूर येथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुष्पा पोडे – पाचभाई यांना नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यासोबतच स्वचेत चेतन कंदीपुरवार यांना नैनिताल येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण २०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्यांचा आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महिला उद्योजक मीनाक्षी वाळके यांनी बांबू कलेमध्ये चंद्रपूरचे नाव सातासमुद्रापलीकडे नेले. त्यांना उद्योगात अत्याधुनिकतेची जोड मिळण्याकरिता लॅपटॉप भेट देण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिपाताई धानोरकर यांनी केले.
यावेळी त्यांच्या आई वत्सला धानोरकर, वाहिनी वंदना धानोरकर, प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, इंटक नेते के. के. सिंग, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष ताजुद्दीन शेख, अल्पसंख्याक नेते रमजान अली, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, अनुसूचित जाती महिला जिल्हाध्यक्ष निशा धोंगडे, अनुसूचित जाती प्रदेश महासचिव अश्विनी खोब्रागडे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक विशाल बदखल, संजय घागी, बसंत सिंग, प्रमोद मगरे, मनोज चिंचोलकर, रवींद्र टेमुर्डे, सौरभ ठोंबरे यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संचालन गोपाल अमृतकर यांनी केले.