दिवंगत खासदार धानोरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

लोकनेत्याची आठवण

News34 chandrapur

चंद्रपूर : ४ जुलै हा चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा वाढदिवस. दरवर्षी हा दिवस कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करीत होते. मात्र, यंदाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाळूभाऊ आपल्यात नाही, ही खंत सर्वांच्या मनात आहे. तरी देखील लाडक्या नेत्याची जयंती ही सामाजिक उपक्रमातून साजरी करण्याचे ठरले.

 

त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस आणि अन्य फ्रंटलच्या कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ, शाळांमधील चिमुकले, महाकाली मंदिरातील भाविक यांच्यासोबतीने हा दिवस साजरा केला.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीशी संलग्नित सर्व फ्रंटलच्या वतीने मंगळवार ४ जुलै २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम नौशाद शेख, राहुल चौधरी आणि चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्ता यांच्या पुढाकारातून पार पडला.

आरोग्याची समस्या तर मग काढा आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड

 

दुपारी १२.०० वाजता माता महाकाली मंदिर परिसरात भक्तांसाठी भोजनदान कार्यक्रम आयोजित केला होता. चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. तर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढकारातून दुपारी १.०० वाजता मातोश्री वृद्धाश्रम येथील ज्येष्ठांना भोजनदान, कपडे वाटप करण्यात आले.
सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, बाबुपेठ येथे दुपारी २.०० वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.

चंद्रपूर शहर जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महापालिकेचे उपायुक्त अशोक गराटे, शिक्षणाधिकारी नागेश नीत यांची उपस्थिती होती. सायंकाळी ५ वाजता शक्तिनगर, वेकोलि दुर्गापूर वसाहत येथे इंटकचे नेते के. के. सिंग यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण, तर, सायंकाळी डेबू सावली वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनी खोब्रागडे, निशा धोंगडे, सागर खोब्रागडे यांच्या पुढाकारातून भोजनदान करण्यात आले.

मातोश्री वृद्धाश्रमातील कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, डॉ. रजनीताई हजारे, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी विनोद दत्तात्रय, इंटकचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी प्राचार्य नरेंद्र बोबडे, घनश्याम मुलचंदानी, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शफाक शेख, कृऊबासचे संचालक दिनेश चोखारे, महेश मेंढे, माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगरसेविका सकिना अन्सारी, संगीता भोयर, ललिता रेवल्लीवार, रोशन पचारे, पवन आगदारी, सुनीता अग्रवाल यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्व. बाळूभाऊ यांच्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.