चंद्रपुरातील सिनर्जी वर्ल्ड घरफोडी प्रकरणात पोलिसांना मोठे यश

चंद्रपूर पोलिसांना मोठं यश

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील उच्चभ्रू सिनर्जी वर्ल्ड भागात 12 जून ला एकाच दिवशी 6 घरफोड्या झाल्या होत्या, याबाबत स्थानिकांनी तक्रार दिली, अथक परिश्रमानंतर या घरफोडी प्रकरणी रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

 

12 जून ला चंद्रपूर शहरातील उच्चभ्रू सिनर्जी वर्ल्ड कॉलोनी भागात जयकुमार नामदेव हे कुटुंबासहित सासुरवाडी ला गेले होते, 12 जून ला रात्रीच्या सुमारास नामदेव यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडत प्रवेश केला व घरी असलेले रोख व सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 68 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत नामदेव यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यावर रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सिनर्जी वर्ल्ड परिसरात जाऊन घटनास्थळी पाहणी केली असता त्याच परिसरातील पुन्हा 5 असे एकूण 6 घरी घरफोड्या करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली, पोलिसांनी त्या कॉलोनी मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी करणारे ते चोर कॅमेऱ्यात कैद झाले.
अज्ञात चोरांनी एकूण 9 लाख 83 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केल्याचे निष्पन्न झाले.

 

घटनेची सविस्तर माहिती घेत त्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि हर्षल एकरे यांनी सुरू केला, घरफोडी च्या गुन्ह्यातील अनेक तांत्रिक बाबी तपासून बघितल्यावर आरोपी बाहेर राज्यातील आहे अशी पक्की माहिती पोलिसांना मिळाली.

चंद्रपूर महानगर नागरिकांना देणार गोल्डन कार्ड

आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी रामनगर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील कुक्सी गावात धडक दिली, आरोपीला अटक करण्यासाठी 10 दिवस पोलीस त्याठिकाणी आरोपीबाबत माहिती गोळा करीत होते, मुख्य आरोपी कोण याची खातरजमा केल्यावर पोलिसांनी 24 वर्षीय भरतसिंग उर्फ भाया भुरू बामनिया याला ताब्यात घेतले.

सिनर्जी वर्ल्ड येथील घरफोडी प्रकरणात चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी पोलिसांनी आरोपिकडून एकूण 6 लाख 66 हजार रुपयांचा माल जप्त केला.
आरोपी भरतसिंग सध्या पोलीस कस्टडी मध्ये असून त्याने चंद्रपूर किंवा इतर ठिकाणी घरफोडी केली आहे का याबाबत चौकशी सुरू आहे.
भरतसिंग सोबत असलेले इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
मात्र गुन्हेगाराची कसलीही माहिती नसल्याच्या आव्हानात्मक गुन्ह्यात पोलिसांनी अथक परिश्रम घेत यश मिळविले ही कौतुकाची बाब आहे.

दिवंगत खासदार धानोरकर यांच्या वाढदिवशी कांग्रेसचा सामाजिक उपक्रम

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, गुन्हे शोध पथक प्रमुख हर्षल एकरे, पोउपनी मधुकर सामलवार, सायबर सेलचे प्रशांत लारोकर, अमोल सावे, छगन जांभुळे, पोलीस कर्मचारी किशोर वैरागडे, भावना रामटेके व आदींनी केली.