चंद्रपूर युवतीसेनेचा इफेक्ट

निवेदनाची तात्काळ दखल

News34 chandrapur

चंद्रपूर – बरेच दिवसापासून गिरनार चौक येथील पोलीस क्वार्टर परिसरात कचऱ्याचे व्यवस्थापन बरोबर होत नसल्याने तेथील नागरिक व ये-जा करणारे लोक त्रस्त झाले होते, शिवाय ती जागा कचरा टाकण्याची सुद्धा नव्हती व तो कचरा ¹उचलला जात नसल्यामुळे तेथील नागरिकांना दुर्गंध व डासांचा त्रास होत होता.

चंद्रपुरात पत्रकाराला धमकी

ही बाब माहिती होताच युवासेना कार्यकारणी सदस्य व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मा. शितलताई देवरुखकर शेठ,चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय संदीप भाऊ गिर्हे, युवासेना जिल्हाधिकारी विक्रांत भाऊ सहारे यांच्या मार्गदर्शनात, युवासेना युवती जिल्हाअधिकारी सौ रोहिणी विक्रांत पाटील यांनी लगेच युवती सेना व तेथील नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिका येथील स्वच्छता अधिकारी साहेबांना निवेदन दिले व त्यांनी लगेच एका तासातच तेथील कचऱ्याचे व्यवस्थापन केले समोर पण तिथे कोणी कचरा टाकणार नाही त्यासाठी कार्यवाही लवकर करू असे सांगितले.

यावेळी युवासेना युवती उपजिल्हा अधिकारी धनश्री प्रभा हेडाऊ, उपजिल्हा समन्वयक संतुष्टी प्रवेश बुटले, शहर युवती अधिकारी हिमानी मेश्राम,तालुका युवती अधिकारी प्रज्ञा ठमके शाखा युवती अधिकारी भाग्यश्री खनके उपस्थित होते.