News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई – महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या रखडलेल्या निवडणुका आता होणार अशी शक्यता राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्राने निर्माण झाली आहे.

मागील वर्षभरापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या होत्या, एकीकडे राज्यात सत्ता संघर्ष होत असताना शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस एकत्र आली व सरकार स्थापन केले, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जाणार अशी शक्यता या सरकारतर्फे निर्माण झाली असून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणूका होऊ शकतात.
ओबीसी आरक्षणाचे काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार असे संकेत दिले होते, ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असुन ऑगस्ट मध्ये त्याचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता आहे, ओबीसी राजकीय आरक्षणाचा निकाल लागला की लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होणार आहे.
राजकीय पक्ष लागले तयारीला
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग सुकर झाला अशी चाहूल राजकीय पक्षांना लागल्याने आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?
राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत 1 जुलै 2023 यादिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या येणाऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वापरण्यात येतील.
निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, निवडणुका नाही
राज्य निवडणूक आयोगाने कसल्याही निवडणुकीची घोषणा केली नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोग आयुक्त मदान यांनी दिले आहे, ग्राम पंचायत निवडणूक वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जैसे थे आहे, त्यामुळे निवडणूक कार्यक्रमांची घोषणा नाहीच.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघाच्या याद्या वापरण्याकरिता विशिष्ट तारीख निश्चित केली जाते.