सापामुळे 33 गावात अंधार पसरला

33 हजार व्होल्टचा झटका

News34 chandrapur

चंद्रपूर/गडचिरोली – दिनांक ४ जुलै आणि दिनांक ५ जुलै दरम्यान चे रात्री १२ वाजता ३३ केव्ही एटापल्ली उपकेंद्रातून निघणारा ३३ केव्ही जांबिया गटटा वीज वाहिनीवर ब्रेक डाऊन झाला होता. दिनांक ५ जुलै रोजी एट्टापल्ली वितरण केंद्रातील वरिष्ठ तंत्रज्ञ श्री किशोर दुर्वा, श्री ईशवरण कडकलकर तसेच विद्युत सहाय्यक शुभम बंडावर आणि रोहित करंजीकर हे रात्रीच १२ वाजता फॉल्ट शोधण्यासाठी गेले असता हेडरी गावाजवळ ३३ केव्ही जांबियागटटा वीज वाहिनीच्या तारावर एक साप मृत अवस्थेत आढळला सदर साप वीज तारांच्या संपर्कात आल्यामुळे लाईन ब्रेक डाऊन झाला होता व त्यामुळे ५० रोहित्रांचा वीजपुरवठा ख्ंडीत झाला व आसपासची ३३ गावे अंधारात गेली. यामुळे १८८५ ग्राहकांचा वीजपुरवठाही बाधित झाला.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट

वरिष्ठ तंत्रज्ञांनी पोलवर चढून मृत अवस्थेत असलेला साप काढून घेतला तसेच हेडरी गावापुढे या वीज वाहिनीचे तारा तुटलेले होते ते जोडण्यासाठी संबंधित वरिष्ठ तंत्रज्ञ आणि विद्युत सहाय्यक गेले आणि दुपारी एक वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. एरव्ही लहानसहान किटकांना आपण घाबरणारे व सापाच्या नावाने घाबरगुंडडी उडणारे, वीजखांबावर चढून साप मृत का असोना भिती सोबत वीजखांबावर चढणे धोकादायकच असते.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताचा चंद्रपुरात धसका

सापाने जरी हालचाल केली नाही तरी घाबरलेले मन केव्हाही लाईनमॅनला खाली पाडून घात करु शकते. अशा वेळेस लाईनमॅनने केलेल्या कामाची प्रशंसा होत आहे. नुकतेच वाघाच्या पंजाचे निशानही आढळले होते. तर चार पाच दिवसापुर्वी धानोरा उपकेंद्रात हत्ती शिरले होते.

 

महावितरणचे कर्मचारी अभियंते रात्रीअपरात्री, उन, वारा, पावसात काम करून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असतात. वीजदुरूस्तीची काम करतांना विदयुत अपघाताचा धोका तर असतो परंतु अनेक परिस्थिती अशाही उद्भवतात की जेथे शारीरिक इजा व प्रसंगी जीवावर बेतते. रानटी पशू, साप, विंचू सारखे सरपटणारे तर कधी रानडुक्कर, वाघ, बिबटे अशा प्राण्यांच्या व आता हत्तींच्या भितीतही काम करून वीजपुरवठा पूर्ववत करावा लागतो. त्याच प्राण्यांमुळे एकीकडे वीजपुरवठा ख्ंडीत होवून अंधार झाल्याने ग्रामस्थांना धोका असतो तर नेमके त्याचवेळी त्याच प्राण्यांमुळे वीजदुरूस्ती करणाऱ्या महावितरणच्या अभियंता व जनमित्रांना धोका असतो. परंतु वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे कर्तव्य जनमित्र व अभियंते पार पाडत असतात.