MIDC कडे जाणारा विकास खड्ड्यात पडला

वाहनधारकांची कसरत

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – मुल शहर व तालुका असलेल्या स्थित मऱ्हेगाव MIDC असलेल्या कंपनी कडॆ जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मधोमध डांबरीकरण फुटून जागोजागी गुडघ्याएवढे खड्डे पडल्याने दररोज जाणाऱ्या येणाऱ्या ट्रक चारचाकी वाहने, दुचाकी वाहने आणि कामगार लोकांना दरदिवशी खड्यातुनच जावे लागत आहे. या खड्यांमुळे घडणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे सर्वच वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

मुल MIDC मध्ये जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी जागोजागी गुडघ्याएवढे खोल व तीन चार फूट लांब खड्डे पडले आहेत. त्यामुळे दरदिवशी या खड्यांतुंनच वाहतूक करावी लागत आहे. प्रसंगी घडणाया छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांही घडत आहेत. करीता वाहनधारक व वाहतूक धारक त्रस्त झाले आहेत. कंपनी कडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.

एक सही संतापाची

पावसाचे पाणी साचल्याने हे खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. रस्त्याच्या मधोमध असलेला गुडघ्याएवढा खड्यात चारचाकी धारक दुचाकी चालकांसाठी धोकादायक ठरत आहे.या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीसह काही नागरिक खड्यात पडल्याच्या घटना समोर घडल्या आहेत.

मोठ्या वाहनधारकांनाही येथून वाहने चालविताना मोठी तारेवरची कसरत करून खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करुन वाहन चालवावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी खड्यात साचले. परिणामी खड्डा दिसला नसल्याने या रस्त्यावरून जाणारा दुचाकीचालक कुटुंबियांसह खड्यात पडून जखमी झाल्याची ताजी घटना नुकतीच घडली असून रस्त्याच्या मध्यभागी पडलेला गुडघ्याएवढा खड्डा कोणाच्या जीवावर केव्हा उठेल, हे येणारा काळच सांगणार आहे.

राष्ट्रवादी कांग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या

दरम्यान, midc मार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ सुरु असते, असे असतानाही या मार्गाच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. या खड्याच्या तसेच मार्गाच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा वाहनधारक व नागरिकांनी MIDC विभागाकडे तक्रारी केल्या आहेत परंतु, विभागाला या खड्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

आणि विभागाचे अधिकारीही टाळाटाळ करीत आहेत. याबाबत वाहनधारकांसह जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांमध्ये व कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे midc विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष पुरऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून तसेच कंपनी कर्मचारी यांचेकडून केली जात आहे.