News34
चंद्रपूर/तोहोगाव – चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसात 6 जणांचा विविध घटनेत मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पहिल्या घटनेत 7 जुलै ला चंद्रपूर गडचिरोली मार्गावर दोन दुचाकीच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला होता, या घटनेच्या दुसऱ्या दिवशी गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे 9 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना वर्धा नदीत जलसमाधी मिळाली.
9 जुलै ला तिन्ही मुलांचे मृतदेह बचाव पथकाला शोध मोहिमेत मिळाले, तिघांचे मृतदेह बघून संपूर्ण तोहोगाव हादरुन गेले आहे.
शनिवारी सकाळची शाळा संपल्यानंतर तोहंगाव येथील शिंदी घाटावर वर्धा नदीच्या पात्रात खेकळे, मासे पकडायला व पोहायला गेलेली तीन मुले वाहून गेल्याची दुदैवी घटना गोंडपिपरी तालुक्यात तोहंगाव येथे दि.(८) शनिवारी दुपारी दोन वाजता दरम्यान घडली.
पोलिसांनी आम्हाला 5 हजार मागितले
चार मुलांपैकी एक परत आला व घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली, त्यानंतर पोलीस व बचाव पथक वर्धा नदीच्या शिंदी घाटावर पोहचत शोध मोहीम सुरू केली.
पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने रात्री शोधमोहिमेला अडथळा निर्माण होत होता.दि.(९) रविवारी १ ते २ किलोमीटर अंतरावर शोध मोहिमेला यश आले. वाहून गेलेल्यापैकी प्रतिक नेताजी जुनघरे या मुलाचा मृतदेह सकाळी ६ वाजता सापडला,सोनल सुरेश रायपुरे याचा मृतदेह ११ वाजता सापडला.निर्दोष इश्वर रंगारीचा मृतदेह आर्वी पुलाजवळ १२ वाजता सापडला मृतदेह बघताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. या दुदैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.