आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ बचतगट व पर्यावरण संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

वृक्षारोपण

News34 गुरू गुरनुले

मुल – मानवाच्या रक्षणासाठी आक्सिजन पर्यावरणाची नितांत गरज आहे. ही गरज भागविण्याची प्रक्रिया केवळ वृक्ष पूर्ण करीत असतात. या उदात्त हेतूने ज्येष्ठ पत्रकार व्हॉईस आफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा नेफडो जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख गुरु गुरनुले यांच्या मातोश्री स्व. यमुनाबाई गुरनुले यांचे स्मृती प्रीत्यर्थ सावित्रीमाई फुले महिला बचतगट व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा मुल यांचे संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड करण्यात आली.

 

याप्रसंगी तेजस्विनी नागोशे बचत गट अध्यक्षा व नेफडो राज्य उपाध्यक्ष, नागपूर विभाग अध्यक्ष, रत्ना चौधरी, नंदा शेंडे मुल तालुका संघटिका, बचत गट सचिव संगीता गुरनुले, शिक्षिका इंदुताई वाढई, वंदनाताई गुरनुले,माधुरी गुरनुले मुल तालुका संघटिका, पुजा मोहुर्ले मुल शहर संघटिका, इंदू मांदाडे, तालुका संघटीका तरुणा रस्से, सुनीता शेंडे, वैशाली नीकूरे, रेखा शेंडे, जयश्री भुस्कुडे, गीता जेंगठे, छाया गावतूरे आदी उपस्थित होते.