News34
चंद्रपूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याताच्या 4 व अधिव्याख्यातांचे 6 पदे मंजूर आहेत. परंतू, त्यापैकी फक्त एक ज्येष्ठ अधिव्याख्याता उपलब्ध असून, त्यांच्याकडे प्राचार्य पदाचा पदभार आहे. उर्वरीत तीन पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. हि मागणी पूर्ण न झाल्यास ताळे लावा आंदोलन करणार असल्याच्या इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.
अधिव्याख्यातांची पाच पदे रिक्त असून एक अधिव्याख्यात्याला पुणे येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याकरीता निर्माण् करण्यात आलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कर्मचाऱ्याअभावी सुरु आहे. त्यामुळे भविष्यात गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणे कठीण होईल.
गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याकरीता अस्तित्वात असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे वरील पदांकरीता तात्काळ नियुक्त्या देऊन सहकार्य करावे अन्यथा वरील संस्थेस ताळे लावून बंद करण्यासंदर्भाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांनाही देण्यात आले.