कर्जाला कंटाळून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने केले विषप्राशन

नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

News34 chandrapur

चिमूर:- चिमूर तालुक्यातील एका 45 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.

चंद्रपुरात वाळू माफियांची दादागिरी

भिमराव रामजी शंभरकर रा. जांभूळविहीरा असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
चिमूर तालुक्यातील जांभूळविहीरा येथील रहीवासी भिमराव रामजी शंभरकर (45) यांचेकडे 10 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये ते कापूस व धानाची लागवड करीत होते. परंतु मागील दोन तीन वर्षापासून शेतीत नापीकी होत होती. त्यामूळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे साडेतीन लाखाचे व खाजगी वेगळे घेतलेल्या कर्जाचा डोंगर त्यांच्यावर चढला होता. ते कर्ज चुकते करू शकले नाही. त्यामुळे कर्ज परतफेडीसाठी त्यांच्या मागे बँकेकडून तगादा लावण्यात येत होता. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त जीवन जगत होते. शंभरकर यांनी कर्जाला कंटाळून 6 जुलै रोजी रात्री घरीच विष प्राशन केले.

17 वर्षीय मुलाचा जीवघेणा हट्ट

त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना नागपूर येथील शासकिय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. तीन दिवसाच्या उपचारानंतर 10 जुलै ला सकाळी दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. नागपूर पोलिसांना शंभरकर यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली आहे. पुढील तपास भिसीचे पोलीस उप निरीक्षक प्रकाश राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.