चंद्रपूर आम आदमी पार्टीने उचलला अतिमहत्वाचा मुद्दा

शिक्षण घेण्याचा नाईलाज

News34

 

चंद्रपूर : शहरातील महानगरपालिकेच्या शाळाकडे मनपाचे नगरसेवक, अधिकारी यांचे नेहमी दुर्लक्ष राहिल्याने आज मनपाच्या शाळा कधी ही पडण्याच्या अवस्थेत आहेत.

 

एकीकडे राज्य सरकार शाळेत विद्यार्थी नसल्याचे कारण पुढे करून शाळा बंद करण्याच्या मार्गावर असताना शहरात चित्र काहीशे वेगळेच आहे. आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे सूरू असलेल्या सर्वेक्षणात प्रथम बाबुपेठ येथिल सिध्दार्थ नगर मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथ. शाळा राजु कूडे यांच्या नेतृत्वात तर इंदिरानगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा संतोष बोपचे यांच्या नेतृत्वात पाहणी केली असता समस्यांचे डोंगर दिसले.

चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर उमेश अग्रवाल यांची आत्महत्या

स्वच्छतेचे तीन तेरा आणि शाळेची ईमारत पडक्या अवस्थेत असताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळाले.
एका शाळेत जवळपास 270 मुलांना शिकविण्याकरिता पाच शिक्षक तर दुसऱ्या शाळेत दोनशे विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ चार शिक्षक त्यामध्ये सुध्दा शिक्षकाना BLO चे काम दिल्याने विद्यार्थ्याच्या शिक्षणावर दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आले.

चंद्रपुरातील या चोराची कमाल एकदा वाचा

शाळेमध्ये फॅन बंद पडलेले अवस्थेत तर छत गळताना दिसून आलें. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचे तर संडास बाथरूम जर्जर अवस्थेत पडण्याच्या मार्गावर आढळले आहे. चिमुकले मुलं जीव धोक्यात घालून शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आले, इंदिरानगर बाबूपेठ ह्या परिसरामध्ये अनेक गरीब कुटुंब वास्तव्यास आहे.

 

एकीकडे प्रायव्हेट कॉन्व्हेंटची वाढती तसेच भरमसाठ फी मुळे नाईलाजास्तव शिक्षण घ्यावे लागते.
मनपातील सत्ताधारी तसेच अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे गोरगरिब मुलांना चांगल्या शिक्षणापासून सुविधेपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टी ने लावला आहे. इंदिरानगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश शाळेची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे या दोन्ही शाळेला मनपातर्फे तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात येत आहे.

Aam Aadmi party chandrapur
निवेदन देताना आप चे पदाधिकारी

जर मनपा प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आप च्या वतीने देण्यात आला.

यावेळेस आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, शहर सचिव राजू कुडे, संघटनमंत्री रहेमान खान पठाण, शहर उपाध्यक्ष सुनील सद्दभयाजी, सिकंदर सागोरे, शहर सह सचिव सुधीर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्निल घागरगुंडे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, अजय बाथव, जयदेव देवगडे, प्रशांत रामटेके इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.