News34
चंद्रपूर – कृषी बाजार समिती मध्ये भाजप पक्षासोबत युती केल्याने चंद्रपूर कांग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून पक्षाने पायउतार केले होते. त्यानंतर पक्षाने आमदार सुभाष धोटे यांना जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार दिला होता. Chandrapur congress president
चंद्रपुरातील लाचखोर ACB च्या जाळ्यात
मात्र त्यानंतर प्रदेशअध्यक्ष पटोले यांच्या निर्णयाला वरिष्ठ कांग्रेस कमिटीने काही काळ थांबविले तसे पत्र सुद्धा व्हायरल झाले होते, त्यानंतर कांग्रेसचा जिल्हाध्यक्ष मी चं आहो असा दावा प्रकाश देवतळे यांनी केला होता. 13 जुलै ला कांग्रेसचे राष्ट्रीय सचिव केसी वेणूगोपाल यांचं जिल्हाध्यक्ष पदाबाबत पत्र धडकले, त्या पत्रात आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपूर कांग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या पत्राने कांग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गिर्हे यांच्यावर गंभीर आरोप, फिर्यादी ने केला खुलासा
प्रकाश देवतळे हे आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहे, वडेट्टीवार यांच्या मागे झालेल्या पत्रकार परिषदेत देवतळे यांनी हजेरी सुद्धा लावली होती.
पक्षाचा जिल्हाध्यक्ष मी चं आहो मला राज्य कांग्रेसचा निर्णय लागू होत नाही अशी बतावणी देवतळे यांनी केली होती, मात्र देवतळे यांचा फुसका बार निघाला, पक्षाने संघटना मजबूत करण्यासाठी आमदार धोटे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी बाजार समिती निवडणुकीत वडेट्टीवार गटाने धानोरकर गटाचा पराभव केला मात्र अनेक ठिकाणी कांग्रेसने भाजप सोबत हातमिळवणी केली होती, एकंदरीत कांग्रेस ने कांग्रेस पक्षाचा पराभव बाजार समिती निवडणुकीत केल्याने कांग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.
बाळू धानोरकर हे कांग्रेसकडून खासदारकीची निवडणूक जिंकल्यावर जिल्ह्यातील कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र नेहमीप्रमाणे कांग्रेसचा अंतर्गत वाद उफाळून बाहेर आला.
जिल्ह्यात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर असे 2 कांग्रेसचे गट निर्माण झाले, मात्र खासदार धानोरकर यांच्या निधनामुळे वडेट्टीवार गटाचा जोर वाढला मात्र जिल्हाध्यक्ष पदाच्या बाबतीत धानोरकर गटाची सरशी राहिली.
भविष्यात कांग्रेस पक्षाचे अंतर्गत वाद पुन्हा बाहेर येणारचं, कारण चंद्रपूर कांग्रेस पक्षात सध्यातरी काही All Is Well नाही.