त्या पूरग्रस्त भागात पोहचले शिंदे

त्या गावात रवींद्र शिंदे यांनी दिली भेट

News34

भद्रावती : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रविंद्र शिंदे यांनी भद्रावती तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामीण जनतेशी चर्चा केली व आपात्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याचा संदेश दिला.

 

मागील वर्षी वरोरा व भद्रावती तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: वेकोली परिसरात असलेल्या उंच मातीच्या ढिगाऱ्यामुळे आसपासच्या गावांना पुराचा वेढा बसला. यामुळे वेकोली परिसरातील गावांमधील जनजीवन विस्कळित झाले होते. शेतातील पिके वाहून गेली होती. गुरेढोरे, जनावरे यांची आबाळ झाली होती. रोगराई पसरली होती. गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. त्यामुळे यावर्षी अशी पूर परिस्थिती निर्माण झालीच तर पूर्व उपाय योजना करून ठेवाव्या, आपात्कालीन व्यवस्था निर्माण करून ठेवाव्या. जनावरांचा चारा व निवाऱ्याची व्यवस्था करून ठेवावी, याबाबत पूरबाधीत गावांची पाहणी करून गावागावात जावून रविंद्र शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जागृती केली.

 

वर्धा नदीच्या अगदी पात्राजवळ वेकोलिने मोठमोठे ढिगारे उभे केले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रातील पाणी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पसरते. चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातील एकोना, माजरी, चारगाव, ढोरवासा, तेलवासा, उकनी, पिंपळगाव, बेलसनी आणि घुग्गुस जवळ नदीपात्रालगतच मोठे मोठे ढिगारे उभे करण्यात आल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी या ढिगाऱ्याना अडून पिपरी (देश), कोची, घोनाड, बेलसनी, चारगाव, कोंढा, माजरी, नागलोन, विस्लोन आणि तालुक्यातील बऱ्याच गावात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे या गावात वेकोली प्रशासनाने आधीच सर्व उपाययोजना करून ठेवाव्या, असे मत रविंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.

 

मागील वर्षी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्यात आले होते. याही वर्षी ट्रस्ट सर्व तयारी करून आहे, अशी परिस्थिती उद्भवल्यास ट्रस्ट पुढे राहील असे रविंद्र शिंदे म्हणाले.

 

ग्रामीण भागातील जनतेने स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर व्दारा श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम,  कै. म. ना. पावडे क्रिडा स्पर्धा, अनाथाची माय स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना आदी योजना सुरू आहेत. गरजूंनी या योजनांकरीता ट्रस्ट कडे अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन देखील रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

 

याप्रसंगी भद्रावती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष बंडू पारोधे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष हेमंत महातळे, निळकंठ कळसकर, ग्रा.प. सदस्य गजानन ढवस, आनंदराव ढवस, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य माणिक गोंडे, भारत पा. ढवस, उपसरपंच शुभांगी ढवस, ब्रह्मदेव ढवस, जयंत महातळे, जनार्दन ढवस, अरुण महातळे, ग्रा. पं. सदस्य सुवर्णा महातळे, वर्षा ढवस, केशव ढवस, बंडू खिरटकर, सौ. बबीता जुमनाके, धनराज कुमरे, प्रीतम ढवस, प्रभाकर काकडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.