जिवती तालुका तेलंगणा राज्याला हस्तांतरित करा

तालुका विलीन करा भूषण फुसे यांची मागणी

News34

चंद्रपूर – जिवती तालुक्यातील नागरिकांकडे महाराष्ट्र शासन व प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष व दुजाभाव केला जात आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीची मालकी हक्क नसल्यामुळे सर्व शासकीय योजना व लाभ नाकारले जातात. आजच्या आधुनिक युगात सुद्धा जिवती तालुक्यात विकास पोहचू शकला नाही, मात्र या तालुक्याला विकसनशील बनवायचे असेल तर तात्काळ जिवती तालुका तेलंगणा राज्यात विलीनीकरण करावा अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे भूषण फुसे यांनी केली आहे.

80 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

जिवती हा एकमेव असा तालुका आहे जिथे जमिनीचे फेरफार बंद करण्यात आलेले आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ह्या तालुक्यात एकही सिंचनाचा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, घरकुल अशा मूलभूत सुविधांपासून तालुक्यातील नागरिकांना वंचित ठेवण्यात आलेले आहे.

Bharat rashtra samiti

या डिजिटल युगात जिवती तालुक्यात सेल्युलर टॉवर नाही त्यामुळे मोबाईल कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. जिवती येथे प्रशिक्षण घेण्यासाठी मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने पोलीस खात्यात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या शेकडो विद्यार्थी व तरुणांना चंद्रपूर येथे स्थलांतर करावे लागत आहे. जिवती तालुक्याचा मानव विकास निर्देशांक सर्वात वाईट आहे.

तालुक्यात नागरिकांना रोजगार मिळेल असे कोणतेही उद्योग या तालुक्यात नाहीत. जिवती तालुक्यातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाची यादी न संपणारी आहे. महाराष्ट्राने जिवती तालुक्यातील लोकांच्या आशा-आकांक्षा धुळीला मिळविल्या आहेत त्यामुळे जिवती तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा भाग म्हणून सांगण्याचा कोणताही नैतिक अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही.
जिवती तालुक्यातील या दयनीय अवस्थेला सध्याचे व माजी मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार जबाबदार आहेत.

मुख्यमंत्री केसीआर यांच्या सक्षम नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारने शेतकरी आणि नागरिकांच्या जीवनात आणि सामाजिक आर्थिक स्थितीत सकारात्मक परिवर्तन केले आहे. तेलंगणात विलीन झाल्यामुळे जिवती येथील नागरिकांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे जिवती तालुका तेलंगणा राज्याचा भाग व्हावा, अशी मागणी भूषण फुसे व जिवती येथील नागरिक करत आहेत.