संततधार पावसामुळे 200 घरात शिरले पाणी

News34 chandrapur

गुरू गुरनुले

मुल – गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या सतत धार जोरदार पाऊसाने कहरच केल्याने तालुक्यात २४० मी.मी. पाऊस पडल्याने आणि अजूनही सारखा पडतच असल्याने तालुक्यातील,जूनसूर्ला,राजोली, चिखली, सुशी, मुल शहरातील २०० घरांची पडझड झाल्याने गरीब नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. भर पावसात आमदार पोहचले पूरग्रस्त भागात

२०० घरात पाणी घुसल्याने नागरिकांच्या सामानाची नासधूस झाली आहे. पुन्हा रात्री असाच संततधार पाऊस सुरू राहिला तर मात्र नागरिकांना बाहेर कुठेतरी हलविल्या शिवाय पर्याय राहणार नाही. घराच्या सभोवताल पाणीच पाणी पुरासारखा पाणी वाहत असल्याने काही नागरिकांच्या घराची पायवाट बंद झाली आहे. घरकुल च्या कामासाठी 5 हजारांची मागितली लाच

सभोवताल पाणी असल्याने साप,विंचू,कीटक, यांचेपासून घरातील लोकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती वाटत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांचे,महिलांचे,नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत मुल तालुका आपत्ती निवारण समिती प्रमुख डॉ. रवींद्र होळी यांचे नेतृत्वात ओमकार ठाकरे, कूमरे नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सर्व मंडळ अधिकारी यांनी तालुक्यातील पुर परिस्थितीची पाहणी करून घरे पडलेल्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली, विचारपूस केली आणि नागरिकांना धीर दिला. सुगंधित तंबाखू माफियांच्या मुसक्या कधी आवळणार – आमदार प्रतिभा धानोरकर

 

मुल-नागपूर मार्ग सात तास बंद

आतापर्यंतच्या इतिहासात अशी नोंद घेण्यात आलेली नाही. १०० वर्षात नागपूर मार्ग अशा ठिकाणी केव्हांच बंद झालेला नव्हता. तो मार्ग यावेळेस अती पाऊसामुळे चिखली च्या पुढे नाल्याला चौफेर पाणी झाल्याने वाहतूक बंद झाली. व सलग सात तास नागपूर मार्गाची वाहतूक बंद झाली असल्याचे मुल तालुका आपत्ती निवारण समितीने सांगितले. सध्यातरी तालुका आपत्ती निवारण समिती लक्ष ठेऊन आहे. परंतु पाऊस येतच असल्यामुळे नागरिकांचे व शेतकरी बांधवांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

मुल -सावली तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पीक गेले वाहून

मुल सावली तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे सर्व धान पीक पुरामुळे वाहून गेले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी धानाच्या पेरण्या, पऱ्हरे वाहून गेले तर खेडी येथील शेतकरी गुरुदास गुरनुले, सुधाकर गेडाम, व बाजूचे शेतकरी, चीमढा येथील युवराज चौधरी, मारोडा येथील अनेक शेतकरी, नवेगाव (भुजला) सुमित आरेकर , त्यांना लगुंन असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र गाटे पाण्याने भरुन असल्याने आवत्या टाकलेले धान पेरण्या डूबून आहेत.

Chandrapur district flood
संततधार पावसाने शेत पाण्याखाली

तसेच कापूस,सोयाबीन, भाजीपाला पाण्यावर पोहत आहे. तालुक्यात झालेल्या पाऊसाची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली असून सर्वाधिक चिखली परिसरात २४० मिलिमीटर पाऊस पडला. तर ग्रामीण भागात जुनसूर्ला, नवेगाव भुजला बेंबाळ, चिखली राजोली, सावली,खेडी, मुल व इतरही गावात सारख्या प्रमाणात पाऊसाची नोंद करण्यात आली असून तालुक्यात असलेले संपूर्ण तलाव,नाले, नदी, बोडया, शेत तलाव, तुडुंब भरले आहे.

एकंदरीत अतिवृष्टी झाली आहे. आज अंधारी नदीला पूर आल्याने मुल पोंभूर्णा मार्ग बंद झाला. मुल चामोर्शी मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. शेतीकडे जाण्यासाठी केलेले अनेक पांदन रस्ते वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील डांबरीकरणाचे रस्ते फुटून गेले आहेत. खेडे गावातील शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे.

ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांवर असलेल्या संकट कालीन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन व झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन मुल सावली असे पूर्वीचे संयुक्त दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.