मणिपूर च्या घटनेवरून महाराष्ट्र विधानसभेत महिला आमदार संतापल्या

महिला आमदारांचा सभात्याग

News34

मुंबई/चंद्रपूर – मागील 77 दिवसापासून देशातील मणिपूर पेटतय मात्र त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्र सुद्धा काढला नाही, 2 दिवसापासून समाजमाध्यमांवर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार व नग्न धिंड काढलेला व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर देशात संतापाची लाट पसरली.

या घटनेचा देशभरातून संताप व्यक्त होत आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अधिवेशनात कांग्रेसच्या महिला आमदारांनी मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला मात्र सभागृहात त्यांना अध्यक्षांनी बोलू दिले नाही.

आमदार वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर व प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर मणिपूर येथे घडलेल्या घटनेचे खापर फोडले, महिला विरोधी भूमिका असल्याने देशात महिला अत्याचारात वाढ होत असल्याचे आमदारांनी सांगितले.

मणिपूर मधील तो व्हिडीओ देशाची मान खाली टाकणारा आहे, महिला अत्याचाराचा विषय आपल्या देशाची जगात काय प्रतिमा आहे त्याची प्रचिती त्या व्हिडीओ च्या माध्यमातून दिसून येते.

विधानसभेच्या सभागृहात आम्हांला मणिपूर बाबत 5 मिनिटे बोलण्याची संधी दिली नाही, विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला साधा निषेध प्रस्ताव मांडू दिला नाही.

आम्हाला बोलू दिले नाही तर मोठे महाभारत होणार अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

विशेष बाब म्हणजे मागील 77 दिवसापासून मणिपूर राज्य जळत आहे, त्यावर मेन स्ट्रीम मीडिया काही दाखवीत नाही याचे मोठे आश्चर्य आहे, देशाची मान खाली टाकणाऱ्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांतून बाहेर आला अन्यथा ही बाब कुणाला कळली नसती.