चंद्रपुरातील पुरोगामी संघटनांनी राष्ट्रपती यांना दिले निवेदन

चंद्रपुरातील विविध संघटनांनी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना दिले निवेदन

News34  Manipur burning

चंद्रपूर – मणिपूर मध्ये तरुणीसोबत झालेला सामूहिक अत्याचार व त्यानंतर काढण्यात आलेली नग्न धिंड या घटनेने आज संपूर्ण देश हादरुन गेला आहे, मागील अनेक दिवसापासून मणिपूर मध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत आहे मात्र त्यावर सरकार गप्प आहे.

चंद्रपुरातील दुर्गापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अवमानना प्रकरणी चंद्रपुरातील पुरोगामी संघटनांनी एकत्र येत कारवाईची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील सामाजिक संघटन भूमिपुत्र ब्रिगेड द्वारे आज मणिपूर व चंद्रपुरातील घटनेचा निषेध नोंदवीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मणिपूर येथे मागील दोन महिन्यापासून सामुहिक हिंसाचाराच्या घटनामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश हादरून गेला आहे.

अशा घटनेमुळे देशच नाहीतर जगात सुद्धा भारताची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच या हिंसक घटना उत्तरोक्त वाढतच चालल्या आहेत. अशातच काल हिंसक जमावाने दोन महिलांची सामूहिक नग्न धिंड काढून त्यांच्यावर जे अमानवी अत्त्याचार केले. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.

अशा घटनांना आळा बसविण्यासाठी समाज कंटकाना अत्यंत तातळीने जेरीस आणून तिथे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, अशी मागणी या निवेदनमार्फत करण्यात येत आहे.

तसेच चंद्रपूर शहरातील मेजर गेट ऊर्जानगर परिसरात परवानाधारक आशा अरविंद जैसवाल यांच्या परवाना अंतर्गत चालत असलेल्या देशी दारूच्या दुकानात रविवार दी. 16 जुलै 2023 रोजी एक घटना उघडकीस आली. या बार ला लागून असलेल्या मुत्रिघरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर लावून त्याची विटंबना केली जात होती. हा भारतीय घटनेचे शिल्पकार व भारतरत्न असलेल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे.

असे कृत्य करणाऱ्या बार चा परवाना त्वरित रद्द करून त्याच्यावर योग्य ती फौजदारीची कारवाही करण्यात यावी. कारवाहीला दिरंग झाल्यास पुन्हा जनतेकडून प्रक्षोभ होऊ शकतो, व त्यास पूर्णपणे येथील शासन व प्रशासन जबाबदार राहील.

मणिपूर व चंद्रपुरातील या दोन्ही घटनांचा पुरोगामी संघटनांनी निषेध नोंदवीत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे.