चंद्रपुरात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे निषेध आंदोलन

केंद्र व राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी

News34

चंद्रपूर – मणिपूर येथे मागील मागील दोन – तीन महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचार,महिलांवरील गावात अमानुष विवस्त्र करून धिंड काढली आणि बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात सर्वत्र निषेध नोंदविण्यासाठी मोठ्याप्रमाणात सामाजिक राजकीय संघटना सोबत नागरिक रस्त्यावर आले आहेत.

चंद्रपुरात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा प्रतीक डोर्लीकर,महिला आघाडीच्या मृणाल कांबळे, निर्मला नगराळे तसेच जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर, महादेव कांबळे,सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश निषेध नोंदविण्यात आला.

त्यानंतर महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले यामध्ये मणिपूर येथील घटनेचे गांभीर्य न लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकार स्पेशल दुर्लक्ष केले आणि कोणावरही कुठलीच कार्यवाही केंद्र किंवा राज्य सरकारने केली नही परिणामी तेथील नागरिकांना महील तीन महिन्यापासून समाजद्रोही लोकांपासून अत्याचार सहन करावा लागत आहे सार्वजनिक तसेच व्यक्तिक मालमत्तेचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एकंदरीत मणिपूर येथील वातावरण मानवीय मूल्यांना काळीमा फासणारे आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकार बरखास्तीची मागणी राष्ट्रपती यांच्या कडे करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यची ओळख पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य असे असताना सुद्धा महाराष्ट्रात महापुरुषांच्या अवमानीच्या घटना आणि येथील सामाजिक दरी निर्माण करण्यासाठी प्रतिगामी शक्ती डोकं उंचावताना दिसत आहे अलीकडे सांगली जिल्ह्यातील बेगड या गावी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान ग्रामपंचायतीचे जातीयवादी कारभाराने जमीनदोस्त करण्यात आली विशेष म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर सर्व परवानगी घेण्यात आल्या होत्या आणि तोडण्याच्या पूर्वी त्या सर्व रद्द करण्यात आल्या परिणामी १५० कुटुंब आपले निषेध नोंदविण्यासाठी मुंबई येथे लाँग मार्च करत निघाले आहे.

त्याच बरोबर चंद्रपूर जिल्हा येथील मेजर गेट परिसरातील देशी दारूच्या दुकानात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मुत्रीघरात लावून महामानवाच्या विटंबनेचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे म्हणून त्या देशी दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केले आहे. या मणिपूर येथील प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि केंद्र व दोन्ही राज्य सरकार बरखास्तीची मागणी राष्ट्रपती यांच्या कडे करण्यात आली आहे.

या प्रसंगी विशाल अलोने,अशोक निमगडे, राजूभाऊ खोब्रागडे, राजस खोब्रागडे,विजय करमरकर, प्रेरणा करमरकर, शहीन शेख,पुष्पा नळे, निर्मला पाटील, वैशाली साठे, वर्षा घडसे,अनिता जोगे, छाया थोरात, शिला कोवाले, पंचफुला वेल्हेकार, राजेश्री शेंडे, विशाल चिवंडे यशवंत मुंजमकर, वामनराव चंद्रिकापुरे, धममदीप मेश्राम,यांच्या सह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती