News34 गुरू गुरनुले
मूल – मुल शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या चंद्रपूर -गडचिरोली – नागपूर महामागांचे दुपदरीकरण झाले खरे पण वाहतुकीची कोंडी संपता संपेना अशी अनेक कारणे असली तरी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा आशीर्वाद व मुल येथील वाहतुक पोलिसांची दाखवली जाणारी मर्जी खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची मुजोरी ही भविष्यात शहरातील असुरक्षीत, जिवघेण्या वाहतुकी मागील मोठे कारण ठरु शकते. पण अपघाताची एखादी मोठी घटना घडल्या शिवाय ट्रॅव्हल्स वाले, परिवहन विभाग व वाहतूक पोलीस जागे होणार नाही.
आजच्या स्थितीत खाजगी प़वासी वाहतुकीच्या साऱ्या नियमांची ऐशीतैशी करून मुल शहरवासियांच्या
सुरक्षिततेची वाट लावण्यापेक्षा एस.टी.
महामंडळाचे डेपोतच खाजगी ट्रॅव्हल्सचे थांबे अधिकुत का करीत नाही? हा संतप्त सवाल उपस्थीत झाल्यास वावगे ठरु नये.
मूल पोलिस ठाण्यातील वाहतुक पोलीस शहरातील अडगडीची वाहतुक कोंडी सोडविण्यापेक्षा खाबू गिरी साठी धावपळीच्या ठिकाणापासून एक की.मी. अंतरावर पहारेगिरी करताना दिसतात. व धावपळ करून खाजगी ट्रॅव्हल्स चालकांना,मालकांना खाली सुट देण्यात व्यस्त दिसतात. व सुरक्षीत वाहतूक नियमांची वाट लावतात असा गंभीर आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे.
ट्रॅव्हल्स स्टँड दूरवर ठेवण्यात यावे
चंद्रपूर शहराच्या ठिकाणी मुख्य बस स्थानकापासून ट्रॅव्हल्स स्टँड हे कितीतरी दूर अंतरावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बस स्थानकाचा व ट्रॅव्हल्स चा काहीही संबंध दिसून येत नाही. परंतु मुल शहरात मुख्य ठिकाणी अगदी बसस्थानकाच्या तोंडावर महामार्गाचे मधोमध ट्रॅव्हल्स गाडया उभ्या करुन प्रवाश्यांना पुकारा देत इकडे तिकडे धावताना दिसून येतात हे कुणामुळे व कोणाच्या आशीर्वादाने सूरू आहे. आणि का ? खर तर हे अपघाताना निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहेत? असा हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून पासून कसा काय सुरू आहे? हा प्रश्न शहरातील जनते समोर पडला आहे.
भविष्यात बस स्थानकावरील वाहतूक सुरक्षित ठेवायची असेल आणि भविष्यात होणारे अपघात टाळायचे असतील तर मात्र खाजगी ट्रॅव्हल्स करीता बसस्थानक पासून चंद्रपूर शहरात जसे खूप दुरावर ट्रॅव्हल्स उभ्या करण्याची परवानगी दिली आहे, तशीच मुल ट्रॅव्हल्स वाल्यांना देखील मुल बसस्थांनकापासून काही दूर अंतरावर ट्रॅव्हल्स उभ्या करण्याची परवानगी द्यावी. जेणे करून अपघातही होणार नाही आणि जनतेची वाहतूकही सुरक्षित होईल.
आधीच मुल बसस्थानकासमोर व्यापाऱ्यांनी रस्त्यावर घाला घालून मुख्य वाहतुकीचा महामार्ग संकुचित केला आहे. आणि या खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी अधिकुत वाहनतळ सोडून अगदी बस स्थानक समोरच ट्रॅव्हल्स उभ्या करणे सुरु केले आहे. महामार्गाचे दोन्ही दुतर्फा आपली ठेकेदारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. रस्ता दुपदरीकरण होऊनही मूल शहरात वाहतुक पोलिसांच्या मर्जीने खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची मुजोरी केव्हातरी जनतेला महागात पडणार आहे. यावर मात्र वचक दिसत नाही असा आरोप जनता करीत आहे.