चंद्रपूर जिल्ह्याच्या पहाडावर धडकले गुलाबी वादळ

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश

News34 chandrapur

चंद्रपूर –  जिवति तालुक्यातील येल्लापुर येथे 27 जुलै ला भारत राष्ट्र समिती चा पक्ष प्रवेश व सदस्य नोंदणी कार्यक्रम बिआरएस चे नेते भुषण फुसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे भिमराव शिडाम ग्रामपंचायत सदस्य गिरजाबाई सिडाम ग्रामपंचायत सदस्य व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सौ.आष्टपाला सतिष क्षिरसागर ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी संघटनेचे शिवदास शिनगारे, भारत कांबळे, धमरत्न भुतके व वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते संग्राम कांबळे, मुरली कांबळे, परमेश्वर कांबळे, मनोज सोनकांबळे, राहुल शिंनगारे, चरन कांबळे, रमेश शिंनगारे, विनायक गायकवाड, बालु बंनसोडे, विकास बंनसोडे, धनराज गायकवाड, संदेश शिनगारे, महेंद्र गायकवाड, लखंन कांबळे, गगन बंनसोडे, आयु मडावि, बालाजि सिडाम, विलास वाघमारे, विशाल कांबळे, दत्तु कांबळे व काँग्रेस पार्टीचे शाखा अध्यक्ष कमलाकर गायकवाड यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते भुषण भाऊ फुसे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भुषण फुसे यांनि तिन्ही ग्रामपंचायत सदस्या चे अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन पक्षांमध्ये स्वागत केले.

अब की बार किसान सरकार चा नारा देत सुबोध चिकटे यांनि पक्षाचे धोरण पटविले त्यानंतर भुषण फुसे यांच्या नेतृत्वात गावात पायदळ प्रचार यात्रा काढण्यात आली.