चंद्रपुरात अगरबत्तीच्या गोदामाला भीषण आग

आगीत लाखोंचे नुकसान

News34 breaking

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील रामाला गार्डन रोडवरील जलाराम कंझुमर नामक अगरबत्तीच्या गोदामाला 29 जुलै ला रात्री 1 ते दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागली, या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे.

भानापेठ व रामाला गार्डन रोडवरील जलाराम कंझुमर नामक अगरबत्तीचे गोदाम आहे, रात्रीच्या वेळी नागरिकांना अचानक अगरबत्तीचा सुगंध येऊ लागल्याने नागरिकांनी बाहेर डोकावले असता त्यांना भीषण आगीचे चित्र दिसले.

अगरबत्ती गोदाम हे नागरी वस्तीत असल्याने नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते यशस्वी झाले नाही याबाबत तात्काळ अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आली.

अग्निशमन विभागाच्या तब्बल 3 वाहनांनी अथक परिश्रम करीत आगीवर नियंत्रण मिळविले मात्र गोदामात असलेली अगरबत्ती पूर्णतः जळून खाक झाली.
या आगीत जलाराम कंझुमर चे चालक मेहुल सचदे यांचं लाखोंचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.
नेमकी आग कशामुळे लागली याबाबत सविस्तर माहिती पुढे आली नाही.