दीड वर्षाच्या मुलीसमोर शेतकरी दाम्पत्याचे धक्कादायक पाऊल

शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या

News34 shocking incident

छत्रपती संभाजीनगर – दीड वर्षाच्या मुलीसमोर शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शेतकरी दाम्पत्याने आर्थिक विवंचनेतून सदर धक्कादायक पाऊल उचलले असल्याची माहिती पुढे आली आहे.

चंद्रपुरात पूर, जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथील शेतकरी 28 वर्षीय राजू दामोदर खंडागळे व 26 वर्षीय अर्चना राजू खंडागळे असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

राजू खंडागळे यांच्याकडे वडिलोपार्जित 2 एकर शेती होती मात्र 2 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता मात्र आई-वडील व 2 भाऊ यांचा उदरनिर्वाह 2 एकर शेतीवर शक्य नसल्याने राजू यांनी एकाची शेती बटाई साठी घेतली मात्र त्यातून सुद्धा आर्थिक उत्पन्न निघत नव्हते.

तो दारू सोडविण्यासाठी गेला आणि घडलं भयानक

सततच्या आर्थिक तंगीमुळे राजू नैराश्यात गेला होता, शुक्रवारी राजू व त्याची पत्नी दोघेही शेतात गेले होते त्यावेळी दोघासोबत त्यांची दीड वर्षाची मुलगी होती.

मुलीला झाडाखाली ठेवत राजू व त्याच्या पत्नीने एकाच झाडाला गळफास लावत आत्महत्या केली, हे सर्व दुर्दैवी दृश्य त्या दीड वर्षाच्या मुलीसमोर घडले, सायंकाळी पती-पत्नी घरी न आल्याने आई-वडिलांनी राजू ला फोन केला मात्र ते कसलाही प्रतिसाद देत नसल्याने आई वडील शेतात गेले मात्र त्याठिकाणी मुलगी रडत होती आणि झाडावर पती-पत्नी लटकलेल्या अवस्थेत होते.

दोघांना खाली उतरवीत रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले, या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करीत पुढील तपास सुरू केला.